पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईसाठी आज 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. जे भारतीय जीडीपीच्या 10% इतके आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमवर देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या वेळी बोलताना मदी म्हणाले, 'मी आज विषेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो आहे. हे पॅकेज आत्मनिर्भर अभियानाची सुरुवात आहे. आत्मनिर्भर अभियानात हे पॅकेज महत्त्वाचा टप्पा ठरेण. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचे आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के इतके आहे. हे पॅकेज देशाच्या आर्थव्यवस्थेला, देशातील जनतेला मोठे मदतगार ठरेन. 20 लाख कोटीचे हे पॅकेज देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्विडीटी आणि लॉस या सर्वांवर भर देण्यात आला आहे. हे पॅकेज लघुउद्योग, कुटीर उद्योग, मोठे उद्योग या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरेन. हे पॅकेज आपल्या आत्मनिर्भर अभियानाची सुरुवात आहे. हे पॅकेज देशातील कामगार, शेतकरी यांच्यासाठी आहे. जे देशातील जनतेसाठी रात्रंदिन काम करतात. जे इमानदारीने कर भरतात. जे देशाच्या विकासात योदगदान देतात. हे पॅकेज देशातील उद्योग आणि जनतेच्या स्वप्नांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी असेन. केंद्रीय मंत्री या पॅकेजची विस्तारीत माहिती लवकरच देतील. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन वाढविण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?)

एएनआय ट्विट

गेल्या सहा विर्षांत जे रिफॉर्म्स झाले आहेत. त्यामुळे देशाचा विकास, व्यवसाय अधिक सक्षम झाले आहेत. अन्यथा कोणी विचारही केला नसता की भारत सरकारचा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खात्यात जाईल. विशेष म्हणजे हे झाले. हे तेव्हा झाले जेव्हा सर्व सरकारी कार्यालये बंद होती. हे शक्य झाले जेएएम मुळे जनधन मोबाईल मुळे, असेही पंतप्रधा मोदी यांनी या वेळी सांगितले.