Representational Image (Photo Credits : PTI)

नव्या शैक्षणिक वर्षापासून (2019-20) देशातील सर्व विद्यापीठांमध्ये सवर्ण आरक्षण लागू होईल, अशी माहिती मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली. मागास सवर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात 10% आरक्षण मिळेल. हे आरक्षण खाजगी आणि सरकारी उच्च शिक्षण संस्थांमध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर मागास सवर्णांना मिळणाऱ्या आरक्षणाचा परिणाम अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणावर पडणार नाही. त्यांचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच अबाधित राहील, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. सवर्ण आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती?

All India Council for Technical Education (AICTE) आणि University Grants Commission (UGC) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिक्षण संस्थांना यंदाच्या प्रॉस्पेक्टसमध्ये आरक्षणाचा मुद्दा जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागास सवर्णांना 10% आरक्षण, पहा या आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी काय आहे पात्रता,कोण ठरणार लाभार्थी ?

हे आरक्षण देशातील सुमारे 40 हजार कॉलेजेस आणि 900 विश्वविद्यालयात लागू करण्यात येईल. तसंच शिक्षण संस्थांमधील जागांमध्ये 25% वाढ करण्यात येणार आहे.