10% Quota for Economically Backward Upper Castes: आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काल मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज संसदेत हे विधेयक मांडले जाणार आहे. भाजपाकडून त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. आज लोकसभेत आणि लगेजच राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहामध्ये मागास सवर्णांना आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यास नेमका कुणाला फायदा मिळणार आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का?
कोणत्या सवर्णांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे ?
जाट,गुज्जर, जयंत, ब्राम्हण, राजपूत, ठाकूर, भूमिहार,बनिया या हिंदू सर्वणांना फायदा मिळेल. सोबतच ख्रिश्चन, मुसलमान,जैन, बौद्ध या समाजातील लोकांनाही फायदा मिळणार आहे. Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
सवर्णांना आरक्षणांचा फायदा मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत?
- आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी वार्षिक उत्पादन 8 लाखापेक्षा कमी असावं.
- शेतजमीन 5 हेक्टरपेक्षा कमी असावी.
- राहत्या घराची जागा 1,000 स्केअर फीटपेक्षा कमी असावी.
- अधिसूचित मनपा क्षेत्रात राहता प्लॉट 109 यार्डपेक्षा अधिक नसावा.
- संबंधित व्यक्तीचा बिगर अधिसूचित मनपा क्षेत्रात ( non-notified municipality area) 209 यार्ड्स पेक्षा अधिक भूखंड नसावा.
आर्थिकदृष्ट्या कमजोर सवर्णांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला 16% आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाज, मुस्लिम समाजदेखील आरक्षणाची मागणी करत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरून वाढून तो 59 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.