Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
Maratha Caste Certificate (Photo Credits: archived, edited, images)

Maratha Caste Certificate online, Offline  Application Procedure : राज्य सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्यानंतर राज्यभर मराठा जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आणि जात पडताळणी (Caste Validity Certificate)  पत्र वाटप करण्याला सुरूवात झाली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणाचा फायदा घ्यायचा झाल्यास त्या व्यक्तीकडे कायदेशीर प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. मग मराठा समाजातील लोकांना त्यांचं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र कुठे आणि कसे मिळेल ? Maratha Caste Certificate : जालना जिल्ह्यात वैभव ढेंबरे तरूणाला देण्यात आलं पहिलं मराठा जात प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय कराल ?

जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात अर्ज सादर करण्याची मुभा आहे.

ऑनलाईन अर्ज कसा सादर कराल ?

testcitizenservices.mahaonlinegov.in/en/Login/Login

ही लिंक ओपन करा. यामध्ये तुमचा Login ID / Profile Register करणं आवश्यक आहे.

तुमचा आय डी बनवलेला असेल तर Caste Certificate या पर्यायावर क्लिक करा.

तुमच्या समोर आवश्यक असणार्‍या प्रमाणपत्राची यादी येईल. त्याखाली Apply बटणावर क्लिक करा.

नवीन ओपन झालेल्या विंडोमध्ये तुम्हांला हव्या असलेल्या जातीचा पर्याय निवडावा लागेल.

आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज सादर केला जाईल. Caste Certificate Status ऑनलाईन ट्रॅक करता येऊ शकते.

ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया काय असते ?

ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईन अर्ज भरून देखील जातीचं प्रमाणपत्र मिळवता येऊ शकत. याकरिता तुम्हाला जवळच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

आवश्यक प्रमाणपत्र -

  • भावंडांचा, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • आधारकार्ड
  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शाळेच्या दाखल्यावर 'हिंदू मराठा' असा उल्लेख आवश्यक आहे

विवाहीत स्त्रियांना त्यांच्या लग्नाचा विवाह नोंदणी दाखला, नावात बदल केला असल्यास त्याचं गॅझेट, पोलिस दाखला सादर करणं गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर मेगा भरतीची देखील घोषणा केली आहे. यासाठी मराठा आरक्षणाचा फायदा उचलत तुम्हांला अर्ज करावयाचा असल्यास जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. (नक्की वाचा :  महाराष्ट्र राज्य नोकरभरती : 72 हजार पदे, जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा? )अर्ज दाखल केल्यानंतर किमान 8-10 दिवसांमध्ये दाखला मिळू शकतो.