Representational Image (Photo Credits: PTI)

Economically Backward Upper Castes Reservation: केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सवर्ण मागास आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले असून लवकरच यासंदर्भातील कायदा लागू होईल. या आरक्षणाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात मागास सवर्णांना 10% आरक्षण मिळणार आहे. मात्र या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाचे कागदपत्रं असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया कोणती आहेत ती महत्त्वाची कागदपत्रं....

उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)

ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे तुमचे उत्पन्न 8 लाखांहून कमी आहे, हे दाखवणारा उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. पहा या आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी काय आहे पात्रता,कोण ठरणार लाभार्थी ?

# जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

तुमची जात कोणती आहे, हे सिद्ध करण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

# बीपीएल प्रमाणपत्र (Below Poverty Line Certificate)

तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असल्याने तुम्ही सवर्ण मागास आहात हे सिद्ध होते.

# पॅन कार्ड (PAN Card)

कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी पॅन कार्ड असणे महत्त्वाचे आहे.

# इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns)

तुमचे उत्पन्न 8 लाखांहून कमी आहे हे सिद्ध करणारा अजून एक पुरावा म्हणजे तुम्ही फाईल केलेले इनकम टॅक्स रिटर्न.

# जनधन योजनेअंतर्गत बँक अकाऊंट (Jan Dhan Bank Account)

सवर्ण आरक्षणाचा फायदा मिळविण्यासाठी तुम्हाला जनधन योजनेअंतर्गत बँक अकाऊंट उघडणे आवश्यक आहे. तुम्ही जर जनधन योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहात, हे सिद्ध होते.

सवर्ण आरक्षणाचा फायदा जाट, गुज्जर, जयंत, ब्राम्हण, राजपूत, ठाकूर, भूमिहार, बनिया या हिंदूंना मिळेल. सोबतच ख्रिश्चन, मुसलमान, जैन, बौद्ध या समाजातील लोकांनाही या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 49% वरून वाढून तो 59% वर पोहोचणार आहे.