Maha Kumbh Stampede: महाकुंभ(Maha Kumbh) मध्ये काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरीची घटना घडली. अनेक भाविकांचा त्यात मृत्यू झाला. त्याशिवाय, शेकडो लोक जखमी झाले. राजकारण्याकडून प्रतिक्रीया येत असतानाच काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे. शशी थरूर म्हणाले, "माझा मित्र सरकारमध्ये मंत्री आहे, त्याने मला कुंभमेळ्याला येण्याची ऑफर दिली होती. मी व्हीव्हीआयपी सुविधांचा लाभ घेऊ शकलो असतो, पण मी ती ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. माझा असा विश्वास आहे की कुंभसारखे कार्यक्रम सामान्य माणसांसाठी असले पाहिजेत आणि सामान्य माणसांची गैरसोय टाळण्यासाठी व्हीव्हीआयपींनी त्यात सहभागी होऊ नये." असे शशी थरूर म्हणाले. (Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video))
महाकुंभ चेंगराचेंगरीवर राहुल गांधींची प्रतिक्रीया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीवर आरोप करताना म्हटले की, "या दुःखद घटनेसाठी खराब व्यवस्थापन आणि सामान्यांपेक्षा व्हीआयपींना प्राधान्य देणे जबाबदार आहे. व्हीआयपी संस्कृती बदलली पाहिजे आणि सर्वसामान्य भाविकांसाठी चांगल्या व्यवस्था केल्या पाहिजेत," असे ते म्हणाले.
चेंगरीनंतर, महाकुंभ परिसराला वाहनमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले, सरकारने गर्दी व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना लागू केल्यामुळे व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले.
प्रशासनात पाच मोठे बदल
संपूर्ण वाहनमुक्त क्षेत्र : महाकुंभ मेळा परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
व्हीव्हीआयपी पास रद्द : कोणत्याही विशेष पासमधून वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
एकतर्फी वाहतूक व्यवस्था : भाविकांची वर्दळ सुरळीत करण्यासाठी एकतर्फी वाहतूक व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
वाहनांच्या प्रवेशावर बंदी : गर्दी कमी करण्यासाठी प्रयागराजच्या शेजारच्या जिल्ह्यांतून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवरच थांबविण्यात येणार आहेत.
4 फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध : शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मौनी अमावास्येला लाखो भाविक स्नानासाठी संगम किनाऱ्यावर पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना बुधवारी ही चेंगराचेंगरी दुर्घटना झाली.