Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video)

'संगमात पवित्र स्नानांसाठी गेलेल्या लोकांना तेथून निघण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली', असे वर्णन प्रत्यक्षदर्शींना केले.

Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video)
Photo Credit- X

Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'मौनी अमावस्ये' च्या पवित्र स्नानासाठी हजारो भाविक जमले असताना बुधवारी महाकुंभमेळ्यात(Maha Kumbh Mela 2025) चेंगराचेंगरीची घटना घडली. जवळपास शेकडो लोक जखमी झाले. आत्तापर्यंत या घटनेत जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. राजकारण्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी तेथे घडलेल्या घटनेची माहिती प्रसारमाध्यांना सांगितली. 'संगमात पवित्र स्नानांसाठी गेलेल्या लोकांना तेथून निघण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली', असे वर्णन त्यांनी केले.

संगमात झालेल्या चेंगराचेंगरीच्या भयावहतेचे एकाने वर्णन करताना सांगितले की, 'घटनेवेळी माझी बहीण, बहिणीची सून, सगळे तिथे होते. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती गर्दीच्या वेळी खाली पडला. त्यानंतर जमावाने त्याला ओढून नेले. चेंगराचेंगरीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले विनय कुमार यादव यांनी ही माहिती दिली. संगममध्ये पवित्र स्नान करणाऱ्या लोकांसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नव्हती. पोलिसांचा बंदोबस्त नव्हता. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांची व्यवस्था नव्हती.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची भीषणता

ही घटना पहाटे 12.30 वाजता आंघोळीसाठी आल्यावर घडली. महाकुंभात त्याच्यासोबत कुटुंबातील 12-13 सदस्य होते आणि शाही स्नानादरम्यान जमावाने त्यांना ढकलले. कर्नाटकातील सरोजिनी या महिलेने सांगितले की, तिच्या कुटुंबाने गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण जागेअभावी ते शक्य झाले नाही. त्यांनी सांगितले की, 'आम्ही फिरत होतो तेव्हा अचानक गर्दी जमली. धक्काबुक्की सुरू झाली. आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्यासाठी जागा नव्हती. बरेच लोक जखमी झाले. आम्ही दोन बसमधून ६० जणांच्या गटात आलो. त्या गटात आम्ही नऊ जण होतो. आमच्यापैकी बरेच जण पडले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली,' असे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

संगमात आपल्या कुटुंबासह उपस्थित असलेले जयप्रकाश स्वामी यांनी सांगितले की, "कुटुंबातील महिला सदस्य गर्दीत पडली होती आणि उठू शकत नव्हती. आम्ही सर्वजण गर्दीत अडकलो होतो. मी बाहेर पडणारा पहिला होतो, नंतर मी मुलांना आणि माझ्या वडिलांना आणि आईला मदत केली" असे ते म्हणाले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).