Karnataka Accident: कर्नाटकातील (Karnataka) दक्षिण कन्नड जिल्हातील बेलथनंगडी येथे एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या महिलेला रुग्णालायत दाखल करण्यात आले. रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरु आहे. (हेही वाचा- पंढरपूरमधील करकंबमध्ये दोन सख्ख्या भावांसह तिघांचा शेतातील तलावात बुडून मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या कारने उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाले आहे. पीडीत महिलेचे नाव अंजली आहे. अंजली रस्त्याच्या कडेला उभी होती तेव्हा भरधाव कारने तिला धडक दिली. त्यानंतर कार ओमनी व्हॅनला धडकली. व्हिडिओमध्ये चारचाकी ओम्नी व्हॅनला सुसाट वेगाने धडकताना दिसत आहे. महिला जखमी अवस्थेत गंभीर पडल्याने तीच्या पतीने आक्रोश करत स्थानिकांची मदत मागितली. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ರಸ್ತೆ ಬದಿ ನಿಂತಿದ್ದ ಮಹಿಳೆಗೆ ಕಾರು ಡಿಕ್ಕಿ: ಮಹಿಳೆಗೆ ಗಂಭೀರ ಗಾಯ, ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲು#CrimeNews #roadacident #caraccident #womeningured #belthangady #hospitalized #roadaccidentnews pic.twitter.com/52HS6zilAf
— U PLUS TV (@uplusujire) January 13, 2024
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. बेलथंगडी पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा भयानय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.