Digital Currency: भारताचे स्वत:चे अधिकृत डिजिटल चलन (India's Digital Currency) 2023 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. हे सध्या उपलब्ध असलेल्या एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटसारखेच असेल, परंतु त्यासोबत 'सरकारी हमी' जोडलेली असेल. एका उच्च सरकारी सूत्राने ही माहिती दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, मध्यवर्ती बँकेच्या समर्थनासह 'डिजिटल रुपया' लवकरचं सादर केला जाईल. (वाचा - Indian Digital Rupee: आरबीआय लवकरच लॉन्च करणार डिजिटल रुपया, केंद्रीय अर्थकंल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा)
सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रिझर्व्ह बँकेने जारी केलेले डिजिटल चलन कोणत्याही भारतीय चलनाप्रमाणेच एका विशिष्ट अंकावर आधारित असेल. ते भारतीय चलनापेक्षा वेगळे असणार नाही. हे फक्त त्याचे डिजिटल स्वरूप असेल. एक प्रकारे, असे म्हणता येईल की हे सरकारी हमी असलेले डिजिटल वॉलेट असेल. डिजिटल चलनाच्या स्वरूपात जारी केलेल्या युनिट्सचा समावेश चलनात असलेल्या चलनात केला जाईल. सूत्राने सांगितले की, आरबीआयने संकेत दिले आहेत की पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल रुपया तयार होईल. (वाचा - Stablecoins नक्की काय आहे? जाणून घ्या या नव्या डिजिटल चलनाबद्दल काही महत्वाच्या बाबी)
रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली डिजिटल रुपी ब्लॉकचेन सर्व प्रकारच्या व्यवहारांचा मागोवा घेण्यास सक्षम असेल. खासगी कंपन्यांच्या मोबाइल वॉलेटमध्ये सध्या ही यंत्रणा नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना सूत्राने सांगितले की, सध्या लोक खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटचा वापर करून खासगी कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करतात. हा पैसा त्यांच्याकडेच राहतो आणि या कंपन्या ग्राहकांच्या वतीने व्यापारी, दुकानदार इत्यादींना कोणत्याही व्यवहारावर पेमेंट करतात.
सूत्राने सांगितले की, “डिजिटल रुपयाच्या बाबतीत नोटा ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या फोनमध्ये डिजिटल चलन ठेवाल आणि ते सेंट्रल बँकेकडे असेल आणि तेथून ते कोणत्याही व्यापाऱ्याकडे हस्तांतरित केले जाईल."