
अलीकडच्या काळात लोकांमध्ये, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आला आहे. मोठ्या संख्येने लोक विशेषतः तरुण क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांचे पैसे गुंतवत आहेत. मात्र, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. यापैकी एक स्टेबलकॉइन्स (Stablecoin) आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये नेहमीच चढ-उतार होत राहतात. याचा अर्थ नाण्यांच्या किंमती कधीही वाढू शकतात आणि कमी होऊ शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना नाणे निवडणे अत्यंत अवघड होते. परंतु, स्टेबलकॉइन्स या समस्येचे निराकरण आहे. त्याबद्दल सविस्तर समजून घेऊ.
स्टेबलकॉइन्स म्हणजे काय?
स्टेबलकॉइन्स हे डिजिटल चलन आहेत, ज्याला फिएट चलन, इतर क्रिप्टोकरन्सी किंवा सोन्यासारख्या मालमत्तेचा आधार आहे. स्थिर मालमत्तेच्या मदतीने या नाण्यांमध्ये फारशी अस्थिरता नसते आणि त्यांच्या किमती स्थिर राहतात. काही स्टेबलकॉइन्स त्यांचे मूल्य तुलनेने स्थिर ठेवण्यासाठी संगणक अल्गोरिदम वापरतात.
स्टेबलकॉइन्सच्गे फायदे-
स्टेबलकॉइन्सचा फायदा असा आहे की ते अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत, ज्याद्वारे इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणे ते अस्थिरतेने प्रभावित होणार नाहीत. याशिवाय, ते मोबॅलिटी देतात. ही एक अधिक स्थिर क्रिप्टोकरन्सी आहे, जी डिसेंट्रलाइज्ड आहे. याचा अर्थ ते कोणत्याही केंद्रीकृत प्रणाली किंवा एजन्सीशी जोडलेले नाही, ज्यामुळे ते स्वतंत्रपणे कार्य करतात.
स्टेबलकॉइन्समुळे पैसे अधिक वेगाने हस्तांतरित केले जाऊ शकतात. यासह, आर्थिक डेटाची गोपनीयता देखील राखली जाते. याशिवाय, स्टेबलकॉइन्सच्या मदतीने, वापरकर्ते फायनान्शीयल सर्व्हिस फी देखील टाळू शकतात. अनेक प्रकारे, इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा स्टेबलकॉइन्स वेगळे असतात. ते अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की त्यांचे मूल्य कमी होत नाही, त्याच वेळी, मूल्यात कोणतीही वाढ होणार नाही. USD नाणे व बिटकॉइनची तुलना करायची तर, याच्या सुरुवातीपासून USD नाणे $1 च्या मूल्यापेक्षा जास्त वाढले नाही, दुसरीकडे, 2019 मध्ये बिटकॉइनचे मूल्य $4,000 होते, जे मे 2021 पर्यंत $60,000 पर्यंत पोहोचले. (हेही वाचा: ICICI Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, वेळेवर Credit Card चे बिल न भरल्यास द्यावा लागेल मोठा दंड)
दरम्यान, क्रिप्टो अस्थिर आणि धोकादायक असतात कारण ते कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केले जात नाहीत. शिवाय, त्यांची किंमत पूर्णपणे नाण्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. त्यामुळे सध्या स्टेबलकॉइन्सचा पर्याय निवडला जात आहे. स्टेबलकॉइन्स हे डिजिटल रोखीचे एक रूप म्हणून देखील पाहिले जाऊ शकते.