कोरोना व्हायरसच्या महासंकटादरम्यान क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक केल्याचे दिसून आले. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणे अत्यंत सोप्पे असले तरीही वेळेवर त्याचे बिल भरणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. यामध्ये जर चूक झाल्यास मोठी रक्कम भरावी लागते. अशातच तुम्ही जर ICICI Bank चे ग्राहक असून क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यास वेळ लागत असेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे.(7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचार्यांचा प्रतिक्षेत असलेला महागाई भत्ता जानेवारी महिन्याच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता - रिपोर्ट्स)
आयसीआयसीआय बँक 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्डच्या शुल्कात बदल करणार आहे. या बदलावाच्या अंतर्गत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे अधिक महागडे होणार आहे. बँकेने एमराल्ड सोडून सर्व कार्डसाठी Late Payment च्या शुल्कात वाढ करण्याचे ठरविले आहे.
10 फेब्रुवारी नंतर जर क्रेडिट कार्डचे पेमेंट 10 हजार रुपयांपर्यंत असल्यास आणि ते वेळवर भरण्यासाठी उशिर होत असेल तर 750 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 25 हजार रुपयांसाठी 900 रुपये, 50 हजारांसाठी 1 हजार लेटे पेमेंट फी द्यावी लागणार आहे. मात्र 100 रुपयांपेक्षा कमी क्रेडिट कार्डचे पेमेंट असेल त्यांच्याकडून कोणताही शुल्क वसूल केला जाणार नाही आहे. पण 100-500 रुपयांदरम्यान ते असल्यास 100 रुपये लेट पेमेंट शुल्क भरावा लागणार आहे. तसेच 501-5 हजार रुपयांच्या दरम्यान असेल तर बँक तुमच्याकडून 500 रुपये लेट पेमेंट फी घेणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या मते, क्रेडिट कार्डच्या रोख पैसे काढण्यासाठी ग्राहकाला किमान 500 रुपये शुल्क भरावा लागेल. हे शुल्क 20,000 रुपयांपर्यंतच्या रोख रकमेवर लागू होईल. यापेक्षा जास्त रक्कम काढल्यास एकूण रकमेच्या 2.5 टक्के दंड भरावा लागेल. चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्न अयशस्वी झाल्यास, किमान 500 रुपये दंड भरावा लागेल.