सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार घेणार्यांना त्यांच्या महागाई भत्त्याच्या अॅरिअर्सची (DA Arrears) प्रतिक्षा आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार कर्मचार्यांना जानेवारी 2022 महिन्यात हा अॅरिअर्स देण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या नववर्षाची सुरूवात दणक्यात होण्याची दाट शक्यता आहे. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day) औचित्य साधत याची घोषणा होऊ शकते असा देखील अंदाज आहे.
Zee Business च्या एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकार त्यांच्या कर्मचार्यांना जानेवारी 2022 च्या पगारासोबत 4500 रूपये अतिरिक्त देणार आहेत. त्यासाठी त्यांना एक व्हाऊचर भरून द्यावं लागणार आहे त्यानंतर कर्मचारी पात्र होणार आहेत. हे देखील नक्की वाचा: PIB Fact Check: Omicron च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचार्यांंचा DA, DR लांबणीवर? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य .
बाल शिक्षा भत्ता अर्थात सीईए (Children Education Allowance) हा एक विशिष्ट भत्ता केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांना देतो, कोविड 19 जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सूट देत जानेवारी च्या पगारासोबत सीईए साठी देखील दावा करण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. Children Education Allowance साठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नाही.
7 व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्यांना 2250 रूपये सीईए मिळतो. कोरोना लॉकडाऊन मध्ये शाळा बंद आहेत. पण सरकारने आता कर्मचार्यांना विना कागदपत्र सीईए साठी दावा करण्यास अनुमती दिली आहे.
सरकारी कर्मचार्यांना आपल्या दोन मुलांसाठी बाल शिक्षा भत्ता मिळतो. त्यामुळे जानेवारी महिन्यात पगारासोबत सीईए 4500 रूपये मिळणार आहेत.
केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या डीए, डीआर च्या प्रतिक्षेमध्ये आहेत. हा महागाई भत्ता 18 महिन्यांच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे वर्षातून दोनदा जानेवारी, जुलै महिन्यात डीए वाढतो. त्यामुळे जानेवारी 2022 चा देखील डीए वाढवला जाईल. त्याची घोषणा देखील प्रतिक्षेत आहे.