केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी भारतीय रिझर्व्ह बँक आर्थिक वर्ष 2022/23 मध्ये डिजिटल रुपया रुपया (Digital Rupee) जारी करेल अशी माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) आज संसदेत सादर झाला. या वेळी निर्मला सीतारमण यांनी सभागृहाला ही माहिती दिली. सीतारमण यांनी सांगितले की, आरबीआय पुढील वर्षांपर्यंत डिजिटल करन्सी (Digital Rupee) लॉन्च करु शकते. आजचा अर्थसंकल्प हा एक प्रकारे डिजिटल बजेट (Digital Budget) होते. त्यामुळे डिजिटल करन्सी (Crypto Currency), डिजिटल बँकींग (Digital University) यूनिट, यांसह ऑनलाईन विद्यापीठ आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा समावेश होता.
डिजिटल करन्सी अर्थातच क्रिप्टोकरन्सी जगभरात विस्तारली आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा अवकाश व्यापत आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने या आधीच चिंता व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीबाबत आपला दृष्टीकोनही या आधीच स्पष्ट केला होता. आरबीआयने म्हटले होते की, क्रिप्टोकरन्सी ही आर्थिक परिदृश्य आणि वित्तीय स्थिरता आदी बाबती गंभीर धोका निर्माण करतात.या पार्श्वभूमीवर सरकारने आगोदरच्या शीतकालीन अधिवेशनात संसदेत माहिती देताना म्हटले होते की, आरबीआय आपल्या डिजिटल योजनेवर काम करत आहे. (हेही वाचा, Digital India Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पात 'डिजिटल इंडिया'चा वरचष्मा, डिजिटल बँके ते Online University उभारण्यापर्यंत अनेक मोठ्या घोषणा; घ्या जाणून)
आजच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने डिजिटल करन्सी बाबत विशेष उल्लेख करण्यात आला. देशभरातच नव्हे तर जगभरात डिजिटल करन्सी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था व्यापते आहे. याला भारतही अपवाद नाही. त्यामुळे येत्या काळात भारत सरकारकडून डिजिटल इंडिया क्रांती करत डिजिटल चलन बाजारात आणले जाईल. हे चलन पूर्णपणे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे सरकारी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारात याचा वापर केला जाईल. दरम्यान, क्रिप्टोकरन्सी कर (Crypto Currency Tax) यावर मात्र आजच्या अर्थसंकल्पात काही विशेष पाहायला मिळाले नाही.