अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रातील भाजप (BJP) प्रणीत एनडीए (NDA) सरकारचा अर्थसंल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात 'डिजिटल इंडिया'वर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे पुढील काळात डिजिटल इंडिया (Digital India) अधिक प्रमाणावर विस्तारण्याची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे. आजचा अर्थसंकल्प हा एक प्रकारे डिजिटल बजेट (Digital Budget) होते. त्यामुळे डिजिटल करन्सी (Crypto Currency), डिजिटल बँकींग (Digital University) यूनिट, यांसह ऑनलाईन विद्यापीठ आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. ज्यात डिजिटल इंडियाला अधिक प्राधान्य देण्यात आले. जाणून घ्या अर्थसंकल्पातील डिजिडल इंडियाविषयी.
आजच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने डिजिटल करन्सी (Digital Rupee) बाबत विशेष उल्लेख करण्यात आला. देशभरातच नव्हे तर जगभरात डिजिटल करन्सी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था व्यापते आहे. याला भारतही अपवाद नाही. त्यामुळे येत्या काळात भारत सरकारकडून डिजिटल इंडिया क्रांती करत डिजिटल चलन बाजारात आणले जाईल. हे चलन पूर्णपणे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे सरकारी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारात याचा वापर केला जाईल. दरम्यान, क्रिप्टोकरन्सी कर (Crypto Currency Tax) यावर मात्र आजच्या अर्थसंकल्पात काही विशेष पाहायला मिळाले नाही. (हेही वाचा, Union Budget 2022: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कपडे, बूटांसह 'या' वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डिजिटल यूनिवर्सिटी (Digital University) उभारण्याबाबतही घोषणा केली. ही युनिवर्सीटी पूर्णपणे ऑनलाईन शिक्षणास चालना देईल. सोबतच शालेय शिक्षण आणि रोजगार, शालेय शिक्षणापासून वंचीत असलेले युवक यांच्यासाठी एक मोठे व्यसापीठ उपलब्ध करुन देईल. ज्याचा भर गुणवत्तापूर्ण शिक्षणावर असेन.
डिजिटल हेल्थ (Digital Health) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही विकास केला जाईल. आयआयटी बंगळुरु डिजिटल हेल्थ यासाठी एक इकोसिस्टम तयार करेन. जी दूददूरपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल. याशिवाय डिजिटल बँकींग यूनीट (Digital Banking Unit) स्थापन करण्यााबाबतही निर्मला सीतारमण यांनी जोर दिला. सरकारी बँकांद्वारे देशभरात 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँक स्थापन केली जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. टपाल कार्यालयांचेही मोठ्या प्रमाणावर अद्ययावतीकरण केले जाईल. त्यांना कोर बँकींग सिस्टमद्वारे जोडले जाईल. ज्यामुळे गवोगावी नवी सुरवात होईल, असेही त्या म्हणाल्या.