Union Budget 2022: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कपडे, बूटांसह 'या' वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर
Clothes, shoes, Diamonds, Jewelry (PC - pixabay)

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा पेपरलेस बजेट सादर केले. यावेळी सीतारामन यांनी 60 हजार तरुणांना नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशभरातील गरिबांसाठी वर्षभरात 80 लाख घरे तसेच डिजिटल चलनाबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान, त्यांनी अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी, आयात शुल्क आणि इतर शुल्क वाढवले तसेच कमी केले. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असून काही वस्तूच महाग होणार आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नेमकी कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत, ते जाणून घेऊयात...

एमएसएमई क्षेत्राला मदत करण्यासाठी, स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीमधून सूट एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांव्यतिरिक्त, रत्ने आणि दागिन्यांवरचे आयात शुल्क पाच टक्के करण्यात आले आहे. सध्या कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे तसेच रत्नांवर आयात शुल्क 7.5 टक्के आहे. (वाचा - Budget 2022 For Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2.37 लाख कोटी MSP हस्तांतरित करण्यात येणार, जाणून घ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं)

स्टेनलेस स्टील आणि कोटेड स्टील, अलॉय स्टीलच्या काही भागांवर काही अँटी-डंपिंग ड्युटी (ADD) आणि काउंटरवेलिंग ड्युटी (CVD) काढली जाईल. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन, चार्जर, ट्रान्सफर इत्यादींवर आयात शुल्कात सूट देण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादनांसाठी आवश्यक रसायनांव्यतिरिक्त, मिथेनॉलसह काही रसायनांवर सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. (वाचा - Budget 2022 for Education: शिक्षणाबाबत अर्थसंकल्पात काय आहे विशेष? शिक्षण क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' घोषणा)

स्वस्त वस्तू -

  • परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील
  • कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील
  • शेतीची साधने स्वस्त होतील
  • मोबाइल चार्जर
  • पादत्राणे
  • हिऱ्यांचे दागिने
  • पॅकेजिंग बॉक्स
  • रत्ने आणि दागिने

महाग वस्तू -

  • छत्री
  • भांडवली वस्तू
  • मिश्रण नसलेले इंधन
  • इमिटेशन ज्वलरी

या अर्थसंकल्पात भांडवली वस्तूंवरील सीमाशुल्क आणि आयात शुल्क 7.5 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय इमिटेशन ज्वेलरीवरही कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. परदेशी छत्र्यांच्या किमतीही वाढणार आहेत. मिश्रण नसलेले इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत.