Salary Calculation | (Photo credit: archived, edited, representative image)

Salary Components And CTC Calculation: प्रत्येक महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्हाला पगाराची स्लिप मिळते, तेव्हा तुम्हाला कधी वाटतं का की ही रक्कम कशी ठरवली गेली? आपले मासिक वेतन किंवा पगार इतकाच (Salary Calculation Formula) का येतो? त्याची विभागणी कशी आहे? (How Salary Is Calculated) अनेकदा तर एचआर (HR Payroll) मंडळी काही गोष्टींचे स्पष्टीकरण देतात, पण ते अजिबातच लक्षात येत नाही. अनेकदा तर ती माहिती अधिकच गुंतागुंतीचीच असते. त्यामुळे पगाराची रचना समजून घेणे हे केवळ आर्थिक नियोजनासाठीच नव्हे तर नोकरी स्वीकृत करताना, नवीन ऑफरचा विचार करताना आणि कर कपात समजून घेताना खूप गरजेचं आहे. खाली या संपूर्ण प्रक्रियेचं स्पष्ट स्पष्टीकरण दिलं आहे.

पगाराचे मुख्य घटक

एकूण पगार वेगवेगळ्या घटकांपासून बनतो. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:

  • मूळ पगार (Basic Salary)
  • घरभाडे भत्ता (House Rent Allowance) (HRA)
  • महागाई भत्ता (Dearness Allowance) (DA)
  • वाहतूक भत्ता (Conveyance Allowance)
  • वैद्यकीय भत्ता (Medical Allowance)
  • विशेष भत्ता (Special Allowance)
  • Bonus/Incentives (जर असतील तर)
  • भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) (PF)
  • प्रोफेशनल कर (Professional Tax)
  • आयकर (Income Tax) (TDS)

पगार गणनेची सूत्रे

A. Gross Salary = Basic Salary + Allowances

ग्रॉस सैलरी म्हणजे कर आणि इतर कपात होण्याआधीची एकूण रक्कम.

सूत्र:

Gross Salary = Basic + HRA + DA + Conveyance + Medical + Special Allowance + Bonus

B. Net Salary = Gross Salary – Deductions

नेट सैलरी म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत मिळणारी रक्कम.

सूत्र:

Net Salary = Gross Salary – (PF + Professional Tax + Income Tax + इतर कपाती)

C. CTC = Gross Salary + Employer Contributions

CTC म्हणजे कंपनी तुमच्यावर एकूण किती खर्च करते ते.

सूत्र:

CTC = Gross Salary + Employer PF + Gratuity + इतर फायदे

पगार गणनेचे उदाहरण

मानधनाची खालील रचना लक्षात घ्या:

पगार संरचना

घटक

रक्कम (₹)

Basic Salary

25,000

HRA

10,000

Conveyance Allowance

2,000
Medical Allowance

1,250

Special Allowance

3,000

Bonus

1,000

Gross Salary

42,250

कपात

कपात प्रकार

रक्कम (₹)

कर्मचारी PF (12%)

3,000

प्रोफेशनल कर

200
उत्पन्न कर (TDS)

800

एकूण कपात

4,000

पगाराची सूत्र समजून घेण्याचे फायदे

  1. आर्थिक नियोजन अधिक चांगलं करता येतं
  2. नवीन नोकरीच्या ऑफर्स विचारात घेताना तुलना सोपी होते
  3. कर भरण्याची स्पष्टता येते
  4. चुकीच्या कपाती त्वरित लक्षात येतात

टीप: दर महिन्याला पगार स्लिप तपासा आणि वरील सूत्रांनुसार पडताळणी करा. अचूक कर नियोजनासाठी विश्वसनीय सल्लागार किंवा सैलरी कॅल्क्युलेटर वापरावा.

(वाचकांसाठी सूचना: येथे देण्यात आलेली माहिती केवळ ढोबळमानाने देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पगार, अस्थापनांचे नियम आणि कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य यांनुसार मिळणाऱ्या वेतनात तफावत आढळू शकते. त्यामुळे या माहितीच्या आधारे आपण आपली पगाराची स्लिप पाहताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याबाबतचे विश्लेषण समजून घ्या.)