युक्रेन-रशिया संघर्षाचे जगभरात आर्थिक क्षेत्राला धक्के बसताना जाणवत आहेत. इंधन दरांसोबत सोन्याचेही भाव (Gold rates) वर-खाली होत आहेत. भारतामध्ये सोनं हे गुंतवणूकीपेक्षा मौल्यवान वस्तूंमध्ये, दागिन्यांमध्ये खरेदी करण्याची पद्धत आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने या सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदीसाठी अनेकांचे त्यांच्या रोजच्या दरावर विशेष लक्ष आहे. आज होळी सारखा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं-चांदी खरेदीचे प्लॅन्स करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांत सोन्याचे झपाट्याने वाढणारे भाव सध्या स्थिर आहेत. उसळी घेतलेले दर आता हळूहळू मंदावत आहेत. मग पहा आजचा सोन्याचा दर काय?
Goodreturns.com च्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर 10 ग्रॅम 22 कॅरेट साठी ₹47,450 आहे तर 24 कॅरेट साठी ₹51,760 आहे. प्रामुख्याने दागिने हे 22,23 कॅरेट मध्ये केले जातात. तर सोनं गुंतवणूकीच्या उद्देशाने तुम्ही वळं, बिस्कीट घेणार असाल तर 24 कॅरेट मध्ये गुंतवणूक अधिक चांगली मानली जाते. दरम्यान हा केवळ सोन्याचा दर आहे. सराफा दुकानात इतर कर आणि घडणावळ देऊन एकून आकडा हा बदलू शकतो. Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण .
सोन्याप्रमाणेच चांदीला देखील ग्राहकांची मोठी असते. आह चांदीचा दर प्रतिकिलो ₹69,000 आहे. सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दरांमध्येही कालच्या तुलनेत थोडी वाढ आहे. देशात प्रमुख मेट्रो सिटीज मध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच आहे. मात्र चैन्नई याला अपवाद आहे.
#Gold and #Silver Opening #Rates for 17/03/2022#IBJA pic.twitter.com/OjXUawLgov
— IBJA (@IBJA1919) March 17, 2022
सोन्याचा वापर महागाईविरूद्ध बचाव म्हणून आणि आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात संपत्ती जतन करण्याचे साधन म्हणून केला जातो. त्यामुळे युक्रेन-रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या.