Aadhaar PVC Cards: 'आधार पीव्हीसी कार्ड' म्हणजे काय? घर बसल्या 'या' पद्धतीने करू शकता ऑनलाईन ऑर्डर; जाणून घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

Aadhaar PVC Card: भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ऑक्टोबर 2019 मध्ये पीव्हीसी कार्डांवर छापलेले एक पूर्णपणे नवीन आधार कार्ड लॉन्च केले होते. नवीन आधार पीव्हीसी कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डसारख्या आकाराचे आहे, जे तुम्ही सहजपणे आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. आपण घर बसल्या आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी एकाचं मोबाइल नंबरवरून आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन मागवू शकता. या कार्डसाठी तुम्हाला फक्त 50 रुपये फी भरावी लागेल. (हेही वाचा - How To Change Mobile Number in Aadhaar: तुमच्या आधारकार्ड मधील मोबाईल क्रमांक कसा बदलाल? फॉलो करा या सोप्या टिप्स)

आधार पीव्हीसी कार्डचे फायदे -

  • हे कार्ड बर्‍याच काळ टिकते. तसेच ते पर्समध्ये ठेवणे सोपे आहे.
  • हे कार्ड चांगल्या पीव्हीसी गुणवत्तेसह आणि लॅमिनेशनसह येते.
  • आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट सारख्या सुरक्षित फिचर्सचा समावेश आहे.
  • यात क्यूआर कोडद्वारे ऑफलाइन पडताळणी त्वरित केली जाते.
  • यात एक लोगो देखील आहे, जो कार्डला अधिक आकर्षक बनवितो.

घरबसल्या असं ऑनलाईन ऑर्डक करा आधार पीव्हीसी कार्ड -

  • स्टेप 1 - आपण यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • स्टेप 2 - आता 'My Aadhaar Section' मधील 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.

    स्टेप 3- आता यात तुम्ही 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी प्रविष्ट करा.

  • स्टेप 4 - नंतर चित्रात दर्शविलेला सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • स्टेप 5 - आता तुम्ही Send OTP वर क्लिक करा.
  • स्टेप 6 - आता आपल्याला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
  • स्टेप 7- आता ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • स्टेप 8 - नोंदणीकृत नसलेल्या मोबाइल क्रमांकासाठी तुम्हाला “My Mobile number is not registered” पर्यायावर जावं लागेल. आता आपला नोंदणीकृत नसलेला किंवा वैकल्पिक मोबाइल नंबर प्रविष्ट करा. मग "Send OTP" वर क्लिक करा.
  • स्टेप 9 - आता आपल्याला पीव्हीसी कार्डची पूर्वावलोकन प्रत दिसेल.
  • स्टेप 10 - आता पेमेंट पर्यायावर क्लिक करा आणि 50 रुपये भरा.
  • स्टेप 11 - यासह आपले आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन मागविले जाईल.

    अशाप्रकारे तुम्ही वरील सर्व स्टेप पूर्ण करून घर बसल्या Aadhaar PVC Card मागवू शकता. हे कार्ड पर्समध्ये ठेवण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे Aadhaar PVC Card ऑनलाईन मागवू शकता. यासाठी तुम्हाला वरील स्टेप नक्की उपयोगात येतील.