आपण देशाचे नागरिक असल्याचे प्रमाण म्हणून पाहिले जाणारे आधारकार्ड (Aadhaar Card) ही तुमची या भारताचा नागरिक असल्याची खरी ओळख आहे. त्यामुळे ते सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवणे तसेच त्यातील माहिती वेळोवेळी अपडेट करणे ही तुमची जबाबदारी आहे. यात नावात बदल (Change Name) असेल तर, पत्ता (Address) वा मोबाईल क्रमांकात (Mobile Number) बदल असेल कर ते करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास आधारकार्ड हे तुमच्या पॅनकार्ड (Pan Card) आणि बँक खात्याशी (Bank Account) लिंक असल्यामुळे तुमची माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. तसेच तुम्हाला आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही कामे असतील तर त्यात तुमचे आधारकार्ड फार महत्त्वाची भूमिका बजावतं.
त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती मोबाईल मेसेज द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा आधाकार्डवरील नंबर योग्य असणे कृगरजेचे आहे. यासाठी काय करावे हे अनेकांना माहित नसेल. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुमच्या आधारकार्डवरील मोबाईल नंबर बदलू शकता. Aadhar Card वरील तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक तपासून पाहण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा
1. Google च्या सर्च बॉक्समध्ये जाऊन तेथे Uidai टाइप करा
2. Enter केल्यानंतर तुम्हाला Uidai चे अधिकृत पेज दिसेल.
3. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला My Aadhaar हा पर्याय दिसेल. त्याच्या ड्रॉप डाऊन अॅरोवर क्लिक करुन Book an Appointment वर क्लिक करा.
4. त्यानंतर आलेल्या पेजवर तुम्हाला आधारकार्ड काय गोष्टी अपडेट्स करायच्या असतील ते पर्याय दिसतील. त्यात मोबाईल नंबर अपडेट हा देखील पर्याय असेल.Aadhaar Card मध्ये पत्ता आणि बँक खाते सुरु करण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून बदल, जाणून घ्या
5. त्याखाली Proceed to Book Appointment हा पर्याय दिसेल. येथे पहिल्या पर्यायात काही राज्ये स्वत:चे स्वतंत्र आधारकेंद्र चालवतात. तुम्ही त्या राज्यात येत असाल तर त्यावर क्लिक करा. अन्यथा त्याखालील Registar Run Aadhaar Seva यावर क्लिक करा.
6. जर तुमच्या राज्याचा पर्याय आधार केंद्रामध्ये असेल तर तो टाकून त्यावर क्लक करुन Ok म्हणा.
7. मग आलेल्या पेजवर तुम्हाला आधार अपडेट पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन तुमचा मोबाईल नंबर टाका. मग तुम्हाला Generate OTP टॅबवर क्लक करावे लागेल.
8. मग मोबाईल वर आलेला OTP नंबर तेथे टाकून Verified OTP म्हणा.
9. त्यानंतर आलेल्या पेजवर तुमचे नाव, आधारकार्ड नंबर सर्व डिटेल्स टाका.
10. सर्व डिटेल्स भरून झाल्यावर Ok म्हणा. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, पत्ता, यातील काही गोष्ट Change करायच्या आहेत ते पर्याय मिळतील.
11. त्यातील मोबाईल नंबर पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर टाईप करा.
12. त्यानंतर Captcha टाकून Next टॅबवर क्लिक करा.
13. त्यानंतर आलेल्या पेजवर तुम्हाला Appointment साठी तारीख निवडायची आहे. त्याचबरोबर सोयीनुसार वेळही निवडायची आहे. त्यानंतर Ok म्हणायचे आहे. त्या Application वरील नंबर लिहून ठेवा वा त्याची एक प्रिंट आऊट काढा. त्या तारखेला दिलेल्या वेळेत तुम्ही निवडलेल्या आधारकेंद्रात जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.
थोडक्यात ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची Appointment बुक करु शकता. आणि तुमच्या आधारकार्डमधील काहीही माहिती वा आधारकार्ड बदलायचे असेल तर अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.