Aadhaar Card मध्ये पत्ता आणि बँक खाते सुरु करण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून बदल, जाणून घ्या
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड (Aadhar Card) असणे महत्वाचे आहे. कारण आधार कार्ड हे सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून एखाद्या व्यक्तीबाबत अधिक माहिती तुम्हाला यामधून दिली जाते. तर व्यक्तीची महत्वाची माहिती अपडेट किंवा बदलण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येतात. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार असे सांगण्यात आले आहे की, आता आधार कार्डवरील पत्ता सहज बदलता येणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना केवायसी (KYC) साठी आधार क्रमांक देतात आणि पत्ता वेगळाच देतात त्यांना  Self Declaration देऊन दुसरा पत्ता देता येणार आहे.

यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेल्या नोकरदारांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत स्थलांतर केलेल्या नोकरदारांना ज्या ठिकाणी सध्या वास्तव केले आहे तेथे बँक खाते सुरु करण्यासाठी अडथळे येत होते. कारण त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या घराचा पत्ता एक आणि ते लोक दुसऱ्या ठिकाणी काम करायचे. हा बदल मनी लॉन्ड्रिंग मधील नियम (Prevention of Money-laundering Maintenance of Records) मध्ये संशोधनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता. या अंतर्गत एखादा व्यक्ती त्याची ओळख पटावी म्हणून आधार कार्ड व्यतिरिक्त दुसरा पत्ता देण्यासाठी आता परवानगी देण्यात आली आहे.(आधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या)

 आधार कार्ड संबंधित सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आधार कार्डवर त्यांचा मूळ पत्ता जरी असला तरीही स्थानिक ठिकाणी बँक खाते सुरु करता येणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असल्यास बँक खाते सुरु करताना आधार कार्ड धारकाला सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे.