Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

यंदा यूपीएससीच्या प्रिलिम्स 2021 च्या परीक्षा (UPSC Civil Services Prelims)  10 ऑक्टोबर 2021 दिवशी होणार आहेत. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन विंडो 12 जुलै 2021 पासून खुली होणार आहे. दरम्यान 19 जुलै पर्यंत ही सुविधा खुली राहणार आहे. विद्यार्थ्यांना याबद्दलची अधिक माहिती upsc.gov.in वर देण्यात आली आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येण्यास सुरूवात झाली आहे त्यामुळे स्थगित केलेल्या परीक्षा आता पुन्हा जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान यंदा देशातील कोविड 19 परिस्थिती पाहता परीक्षा केंद्र वाढवण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रातही परीक्षा केंद्र वाढवली जाणार आहेत. दरम्यान पहिला अर्ज करणार्‍याला प्राधान्य अशा पद्धतीनुसार केंद्रं दिली जाणार आहे. परीक्षेसाठी यंदा काही नियम लागू आहेत तेच कायम राहणार आहेत. अल्मोड़ा, उत्तराखंड, श्रीनगर, उत्तराखंड, नाशिक(महाराष्ट्र) आणि सूरत(गुजरात) मध्ये चार अतिरिक्त सेंटर्स वाढवले जाणार आहे. UPSC Revised Calendar For 2021-22: युपीएससी ने जारी केलं नवं वेळापत्रक; इथे पहा आणि डाऊनलोड करा कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षांचे संपूर्ण टाइमटेबल.

महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोविड 19 संकटामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. यावर्षी अनेक स्पर्धा परीक्षा या नियमित वेळापत्राच्या मागे आहेत. अनेक स्पर्धा परीक्षांच्या नव्या तारख्या जाहीर झाल्याने सिव्हिल सर्व्हिस मध्ये येण्याची धडपड करणार्‍या अनेकांना नवी उमेद मिळाली आहे.