How To Update Aadhaar: 10 वर्षांपूर्वी आधारकार्ड बनवलेल्यांना UIDAI कडून त्याच्यात बदल करण्याचे आवाहन
Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक महत्त्वाचा दस्ताऐवज आणि ओळखपत्राचा दाखला आहे. भारतीय सोयी सुविधांचा लाभ सहजपद्धतीने घेता यावा यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड आणि आधार क्रमांक असणं आवश्यक आहे. त्यासाठी UIDAI कडून नागरिकांना आधार कार्डसाठी अर्ज करण्याची आणि त्यामध्ये वेळोवेळी अपडेट करण्याची सुविधा दिली आहे.यामध्ये आता UIDAI ने केलेल्या नव्या आवाहनानुसार, 10 वर्षांपूर्वी आधारकार्ड मध्ये माहिती नोंदवलेल्यांनी आता त्यामध्ये अपडेट करावेत. दरम्यान हे केवळ आवाहन आहे बंधनकारक नाही.

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बनवून 10 वर्षे झाली असतील, तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील सर्व बदलांशी संबंधित कागदपत्रं अपडेट करावी लागतील. या संदर्भात UIDAI ने ट्विट करून लोकांना 10 वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुन्हा एकदा तुमचा ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) अपलोड करावा लागेल. नक्की वाचा: Verify Aadhaar Card: संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा - UIDAI.

पहा ट्वीट

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधारकार्डधारक नाव, पत्ता, जन्मतारीख (कमाल तीन वर्षांचा फरक), मोबाईल फोन नंबर, फोटो आणि बायोमेट्रिक माहिती त्यांच्या आधार कार्डमध्ये अपडेट करू शकतात. हे अपडेट्स घरबसल्या ऑनलाईन देखील करता येऊ शकणार आहेत. http://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती अपडेट करू शकता किंवा नजिकच्या आधारकार्ड केंद्रालाही भेट देऊ शकता.