आधार कुठे, कधी वापराल? दूर करा स्वतःचा संभ्रम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

‘आधार’ बाबतीत सुप्रीम कोर्टाने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. आपण वापरत असलेले आधार सर्व बाबतीत सुरक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आधार बाबतीत गोपनीयतेचे कोणतेही उल्लंघन होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

याचसोबत न्यायालयाने आधार कार्ड वापरण्यासंबंधात काही बदल करीत, आता आधार कार्ड कोणत्या ठिकाणी अनिर्वाय आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही याबाबत भाष्य केले आहे.

जाणून घेऊया कोणत्या बाबतीत आधार बंधनकारक असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही

बंधनकारक –

– पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करणेअनिवार्य असणार आहे.

– आयकर रिटर्न दाखल करण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

– सरकारी योजनेचा लाभ आणि सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्डवरील सक्ती कायम आहे.

बंधनकारक नाही -

– मोबाईलमधील सीमकार्ड घेताना, बँक खाते उघडण्यासाठी आता आधार कार्डची गरज नाही.

– बँक खाते आधार कार्डला लिंक करणे गरजेचे नाही.

– सीबीएसई, नीट, युजीसी सारख्या बोर्ड परीक्षांमध्ये आधार कार्ड सक्तीचे नसणार.

– 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्रवेशासाठी आधार कार्डची सक्ती नाही.

– 14 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांकडे आधार कार्ड नसेल तर केंद्र आणि राज्य सरकार त्यांना कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवू शकत नाही.

– टेलिकॉम कंपनी, इ-कॉमर्स, खाजगी बँक आणि यासारख्या अन्य संस्था आधार कार्डची मागणी करू शकत नाही.