रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. वास्तविक, दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) आणि यूको बँक (UCO Bank) यांनी एफडीचे व्याजदर बदलले आहेत. नवे दर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. याआधीही अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत.
सीबीआयचे नवीन व्याजदर -
व्याजदरातील बदलानंतर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा किमान व्याज दर 2.75 टक्के आणि कमाल व्याज दर 5.15 टक्के आहे. (वाचा - Bank of Maharashtra Recruitment 2022: बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांवर Generalist Officer पदांवर नोकरीची संधी; bankofmaharashtra.in वर 22 फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज!)
- 7-14 दिवसांसाठी व्याज दर 2.75 टक्के आहे.
- 15-30 दिवसांसाठी 2.90 टक्के व्याजदर
- 31-45 दिवसांसाठी 2.90 टक्के
- 46-90 दिवसांसाठी 3.25 टक्के
- 1-179 दिवसांसाठी 3.80 टक्के आहे
UCO Bank नवीन व्याजदर -
त्याचबरोबर युको बँकेनेही आपल्या व्याजदरात बदल केला आहे. UCO बँकेचा किमान व्याज दर 2.80 टक्के आणि कमाल व्याज दर 5.60 टक्के आहे.
- 7-29 दिवसांसाठी 2.80 टक्के व्याजदर
- 30-45 दिवसांसाठी 3.05 टक्के
- 46-90 दिवसांसाठी 3.80 टक्के
- 91-180 दिवसांसाठी 3.95 टक्के
- 181-364 दिवसांसाठी 4.65 टक्के आहे
- 1 वर्षासाठी 5.35 टक्के
- 1-2 वर्षांसाठी 5.60 टक्के
- 2-3 वर्षांसाठी 5.60 टक्के
- 3-5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.80 टक्के
- 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी 5.60 टक्के आहे
यापूर्वी अनेक बँकांच्या एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. देशातील SBI, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादींनी देखील मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत.