Toll Tax Collection New Method: विविध शहरांतील रस्त्यांवरुन प्रवास करत असताना टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगेत वैतागून जाण्याचा बहुदा सर्वांनाच अनुभव. आता याच त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. गडकरी यांनी म्हटले आहे की, देशभरातील विविध वाहने सॅटेलाईटशी जोडली जातील. जेणेकरुन ऑनलाईन पद्धतीनेच टोल वसुली केली जाईल. त्यामुळे कोणाला लांबच लांब रांगा लावून उभे राहण्याची गरज नाही. दुसऱ्या बाजूला टोल चोरी करण्याच्या प्रकारालाही आपोआपच आळा घातला जाणार आहे.
गडकरी यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, देशात उपग्रह आधारीत वाहनांच्या नंबर प्लेट दिल्या जातील. त्याच्या माध्यमातूनच टोल वसूली केली जाईल. याबाबत जोरदार तयारी सुरु आहे. साधारण वर्ष 2024 पूर्वी ही प्रक्रिया सुरु होील. देशभरातील 26 ग्रीन एक्सप्रेस हायवे सुरु केले जातील. ज्यामुळे रस्ते अमेरिकेपेक्षा कमी असणार नाहीत.
राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हमाले, आता एखाद्या वाहन चालक अथवा मालकाने टोल दिला नाही तर त्याला शिक्षेचे प्रावधान असणार नाही. त्यासाठी नवी तांत्रिक प्रणाली राबवली जाईल. त्यासाठी संसदेत एक विधेयक आणले जाणार आहे. देशभरामध्ये पुढच्या सहा महिन्यांमध्ये ही नवी प्रणाली लागू केली जाईल. त्यासाठी व्याप्त स्वरुपात प्रयत्न केले जातील. जेणेकरुन टोल देण्यापासून कोणीच वाचणार नाही.जो कोणी टोल देण्यापासून टाळाटाळ करेन त्याला शिक्षेचे प्रावधान ठेवले जाईल.
देशभरातील वाहन निर्माता कंपन्यांना वाहनात जीपीएस सुविधा देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन टोल वसूली सोपी होऊन जाईल. तसेच, लोकांनाही सुटकारा मिळेल. पुढे ते असेही म्हणाले की, देशात आतापर्यंत 26 ग्रीन एक्सप्रेस हाय-वे बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. वर्ष 2024 पर्यंत देशात 26 ग्रीन एक्सप्रेस हायवे सुरु होतील. त्यानंतर रस्तेविकासात देश अमेरिकेच्या पाठिमागे असणार नाही.