OTP Frauds पासून सावध रहा! EMI 3 महिने पुढे ढकलण्यासाठी ओटीपी फोनवर शेअर करण्याची गरज नाही, बॅंकांचा ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला
OTP Fraud (Photo Credits: Pixabay)

135 कोटी लोकसंख्येचा भारत देश सध्या लॉकडाऊनमुळे एकाच ठिकाणी अडकूनपडला आहे. 21 दिवसांच्या संचारबंदीमुळे अनेकांना अत्यंत गरजेचे काम असेल तरच बाहेर पडण्याची, हिंडण्याची मुभा आहे. पण याचा फायदा घेत सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढू शकतं. बॅंकेपासून अगदी ऑटो, फॅशन ब्रॅन्ड्स यांच्याकडून खोटे फोन येण्याची भीती आहे. याच्यामाध्यमातून मोठा आर्थिक फटका बसू शकतो. म्हणूनच स्टेट बॅंक, कर्नाटक बॅंक यांनी आपल्या सोशल मीडीया हॅन्डल्सच्या माध्यमातून त्याबाबत ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्राहकांना ईआयएम पुढे ढकलण्यासाठी फोनवर ओटीपी शेअर करण्याची गरज नाही. असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी फोनवर बॅंकेचे किंवा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी असं म्हटलं आहे.

भारतामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवहार ठप्प आहेत. परिणामी हातावर पोट असणार्‍या अनेकांना आर्थिक चणचण भासू शकते. या दृष्टीकोनातून आरबीआयने बॅंकांना पुढील तीन महिने ग्राहकांना ईएमआय भरता न आल्यास त्यावर फी आकारली जाऊ नये अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता नागरिकांना बॅंक ईएमआय 3 महिने पुढे ढकलण्याची मुभा देत आहे.

PIB Tweet

कर्नाटक बॅंक ट्वीट

लोकांची फसवणूक करण्यासाठी केवळ बॅंकेच्या नावाने फोन येतात असे नाही. तर अनेक ग्राहकांना Amazon आणि Bafna Motors च्या नावानेदेखील फोन येत आहेत. KYC process साठी ओटीपी शेअर करा असं सांगूनदेखील अनेकजण खोटे फोन करत आहेत. त्याच्यामधून सामान्यांच्या बॅंक अकाऊंटमधून पैसे उकळले जात आहेत.