मिसाईल मॅन अब्दुल कलामांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
डॉ. अब्दुल कलाम (Photo Credits: PTI)

देशाचे 11 राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या उतुंग व्यक्तिमत्त्वाने प्रत्येक भारतवासीयाच्या मनात स्थान निर्माण केले. लहान मुले आणि तरुणांशी त्यांचे खास नाते होते. त्यांचे विचार अतिशय स्पष्ट आणि प्रेरणादायी होते. शास्त्रज्ञ, शिक्षक आणि राष्ट्रपती असे अब्दुल कलामांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व.  वाढदिवसानिमित्त या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे काही खास पैलू जाणून घेऊया..

मिसाईल मॅन

अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पहिला स्वदेशी उपग्रह SLV-3 क्षेपणास्त्र बनवण्याचे श्रेय अब्दुल कलामांना जाते. त्यांच्यामुळेच भारत आंतरराष्ट्रीय अंतराळ क्लबचा भाग होऊ शकला.

सकाळी चार वाजता उठत

कलाम ८ वर्षांचे असल्यापासून चार वाजता उठत असतं. अंघोळ करुन गणिताच्या शिकवणीसाठी जात. स्वामीयर या प्राध्यापकांकडे ते शिकायला जात असतं. अंघोळीशिवाय शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ते शिकवत नसतं. ते कलाम धरुन फक्त पाच विद्यार्थ्यांची शिकवणी घेत असतं. दरवर्षी निःशुक्ल शिकवत असतं. या शिकवणीमुळेच कलाम यांना सकाळी लवकर उठण्याची सवय लागली.

संगीताबद्दल विशेष प्रेम

एका मुलाखतीत कलाम यांनी सांगितले होते की, संगीत आणि नृत्य ही अशी साधना आहे ज्यामुळे आपण वैश्विक शांतता सुनिश्चित करु शकतो. कलेत संपूर्ण विश्वाला एकत्र आणण्याची ताकद आहे. कलाम यांना संगीताबद्दल विशेष प्रेम होते.

युथ आयकॉन

डॉक्टर कलाम लहान मुले आणि तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच कलाम 2003 आणि 2006 साली एम टीव्हीअंतर्गत युथ आयकॉन ऑफ द ईअरसाठी नामांकन मिळाले. तरुणांशी संवाद साधणे त्यांना खूप आवडत असे.

लोकांचे राष्ट्रपती

डॉ. कलाम यांना पिपल्स प्रेसिडेंट म्हटले जाते. कारण त्यांच्या कनेक्ट सामान्यांपर्यंत होता.

भारतरत्न राष्ट्रपती

कलाम यांना १९९७ साली सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. झाकीर हुसैननंतर कलाम असे व्यक्ती होते त्यांनी भारतरत्न मिळाल्यानंतर राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळली.

पेपर टाकण्याचे काम

देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलान यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडीलांना मदत करण्यासाठी ते घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतं.

पुस्तकप्रेमी

कलामांचे पुस्तकाशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. त्यांच्या घरी हजारो लायब्ररी आहे. ही पुस्तके त्यांची मोठी संपदा आहे. आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो.