कोरोना वायरस लॉकडाऊन नंतर अधिकच जटील झालेल्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता भारत सरकारने अजून एक नवी सुविधा खुली केली आहे. आता भारतामध्ये मजूरांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडण्यासाठी टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने (TIFAC) श्रमिक शक्ती मंच (Shramik Shakti Manch) नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्स च्या मदतीने चॅटबोटद्वारा सक्षम मजूरांना नोकरीच्या संधीची माहिती दिली जाणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर इच्छूक उमेदवारांना Hi हा मेसेज 7208635370 नंबर वर पाठवायचा आहे.
कोरोना वायरस संकटामध्ये मोठ्या प्रमाणात श्रमिक, मजदूर शहराकडून आपल्या मूळगावी परतले. अनेकांचे नोकरी धंदे बुडाले. पण आता पुन्हा या श्रमिकांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी उद्योगधंद्यामध्ये असलेल्या नोकरीची संधी आणि त्याबद्दलची माहिती देणार आहेत. New Labour Codes: कर्मचाऱ्यांना मिळू शकेल आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी; चालू आहे नव्या लेबर कोड्सवर विचार.
नोकरीची संधी पाहण्यासाठी काय करावं लागेल?
श्रमिक शक्ती मंच द्वारा नोकरी च्या संधीची माहिती देण्यासाठी पोर्टलवर देशभरातील MSME चा नकाशा देण्यात आला आहे. यामध्ये इच्छुकाला 7208635370 या नंबर Hi पाठवायचं आहे. त्यानंतर त्याची माहिती घेतली जाईल त्यामध्ये स्किल्सची देखील माहिती विचारली जाणार आहे. मग मजूराची स्किल्ससोबत कोणत्या उद्योगधंद्यामध्ये कोणती संधी आहे हे पाहून त्याला माहिती दिली जाणार. मजुराच्या कौशल्यानुसार, हे पोर्टल त्याच्या शहरातील, गावातील रोजगाराच्या संधीची माहिती मजुरांना देणार आहे.
व्हॉट्सअॅप चॅटबॉट सध्या केवळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. लवकरच यामध्ये अन्य भारतीय भाषांचा समावेश करण्याचं काम सुरू आहे.