Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

रेल्वे रिक्ट्रुमेंट बोर्ड (Railway Recruitment Board) कडून Sub-Inspectors (Exe.) आणि Constables (Exe.)या दोन पदांसाठीच्या नोकरभरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वे प्रोक्टेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स मध्ये ही पदं आहेत. सध्या रेल्वेमध्ये पात्र सब इंसपेक्टर, कॉन्स्टेबल पदांसाठी नोकरभरती होणार आहे. rpf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईट वर इच्छूक उमेदवारांनासारी माहिती मिळणार आहे सोबतच तेथे अर्ज देखील करता येणार आहे. या पदभरती मध्ये 2250 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

2250 पैकी 2000 जागा या कॉन्स्टेबल आणि 250 जागा सब इंसपेक्टर पदांसाठी असणार आहेत. निवड प्रक्रिया ही अ‍ॅग्रिगेट PET,PST परीक्षेच्या गुणांवर अवलंबून असणार आहे. सारे टप्पे यशस्वीरित्या पार करणार्‍यांनाच निवड प्रक्रियेत यश मिळणार आहे.

Railway Protection Force मध्ये नोकरी मिळवण्यासाठी Railway Recruitment Board कडून RPF SI आणि Constable exam 2024 ची परीक्षा होईल. यासाठी नोटीफिकेशन आणि अर्ज प्रक्रिया 2 जानेवारीपासून सुरू झाली आहे. इथे पहा नोटिफिकेशन.

Railway Recruitment Board कडून अद्याप रजिस्ट्रेशन तारखांची नोंद झालेली नाही. पदसंख्या देखील तात्पुरती संभाव्य आहे त्यामध्येही वाढ केली जाऊ शकते. नक्की वाचा: RPF Recruitment Fake News: RPF मध्ये 9,000 कॉन्स्टेबलची भरती होणार आहे का? भारतीय रेल्वेच्या व्हायरल बातमीचे सत्य जाणून घ्या .

बोर्डाने एकूण 2250 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यापैकी 15% जागा महिला उमेदवारांसाठी आणि 10% माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तात्पुरत्या रिक्त जागा आहेत.