PPF आणि  सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर, 31 मार्चपर्यंतची डेडलाईन पाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान
Investment | (Photo Credits: Twitter)

गुंतवणूकदार, व्यवसायिक आणि नोकरदार व्यक्तीसाठी मार्च महिना हा अत्यंत महत्त्वाचा. आपल्याकडे मार्च महिन्यात आर्थिक वर्ष (Financial Year) समाप्त होते. त्यामुळे करपरतावा, करसवलत आणि संभाव्य दंड टाळण्यासाठी गुंतवणूकदार मोठी धावाधाव करतात. अनेक नागरिकांना सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Scheme) यांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षीत आणि महत्त्वाची वाटते. पण ही गुंतवणूक करत असताना 31 मार्च ही समय सीमा लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण घ्या जाणून.

सार्वजनिक भविष्य निधी (Public Provident Fund) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) या दोन्हींमध्ये गुंतवणुक करण्यासाठी खाते उघडायचे असेल तर सर्वसाधारण रक्कम आणि इतर बाकी याची बेरीज आर्थिक वर्षाच्या शेवटी होते. त्यामुळे आपल्या वित्तीय वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी आपण सर्वसाधारण रक्कम जमा करण्यात आली नसेल तर आपले खाते निष्क्रिय होऊ शकते. (हेही वाचा, Women's Day 2022 Special: जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या मोदी सरकारच्या महिलांसाठीच्या 'या' खास 6 योजना; घरबसल्या घेऊ शकता लाभ)

जर आपण पीपीएफ (PPF) किंवा सुकन्या समृद्धी योजनेत सर्वसाधारण बाकी कायम केली नसेल तर हा महिना संपण्यापूर्वीच आपणास हे काम करावे लागणार आहे. ज्या लोकांनी हे काम आगोदरच केले आहे त्यांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत सरकारने प्रतिवर्ष व्याज दर 7.9% निश्चित केला आहे. जो 1 एप्रिल 2020 पासून अधिक प्रभावी दिसतो आहे.

सुकन्या समृद्धी अकाऊंटमध्ये सरकारने व्याज दर प्रति वर्ष 7.6% निश्चित केला आहे. जो 1 एप्रिल 2020 पासून प्रभावी या योजनेतही एकूण गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खात्यात वार्षीक कमीत कमी 250 रुपये आणि अधिकाधीक 1.50 लाख रुपये जमा करता येऊ शकतात.