Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

National Pension System : सेवानिवृत्तीनंतर मिळवा महिन्याला दोन लाख रुपयांपर्यत खास पेंशन, जाणून घ्या काय नॅशनल पेंशन सिस्टीम

NPS गुंतवणुकीसाठीचा एक उत्तम पर्याय आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे दिला जाणारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. भारतीय नागरिकांना वृद्धापकाळाची सोय म्हणून PFRDA कडून ही पेन्शन दिल्या जाते.

माहिती Snehal Satghare | Jul 04, 2022 02:15 PM IST
A+
A-
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

प्रत्येक पगारदार कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्यासाठी सेव्हिंग करायची असते जेणेकरून निवृत्तीनंतरच्या काळात त्याला त्याचं आयुष्य उत्तम पध्दतीने घालवता येईल. यासाठी विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) त्यापैकी एक उत्तम पर्याय आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे दिला जाणारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. भारतीय नागरिकांना वृद्धापकाळाची सोय म्हणून PFRDA कडून ही पेन्शन दिल्या जाते.

 

काय आहे NPS सेव्हिंग योजना :-

NPS ही भारत सरकारची स्वयंसेवी पेन्शन योजना आहे. जी पेन्शन फंड रेग्युलटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे (PFRDA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही पेन्शन आणि  गुंतवणूक योजना आहे. जी भारतीय नागरिकांना वृद्धापकाळाची सुरक्षा म्हणून गुंतवणूक करण्यास मदत करते. सेवानिवृत्तीनंतर बचत करण्यासाठी NPS हा सुरक्षित आणि दीर्घकालीन बचत मार्ग आहे.

 

NPS साठी कोण अर्ज करण्यास पात्र:-

18-65 वर्षे वयोगटातील भारतातील कोणताही वैयक्तिक नागरिक (निवासी आणि अनिवासी दोन्ही) NPS मध्ये सामील होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला फक्त एक NPS खाती उघडण्याची परवानगी आहे. पण एखाद्या व्यक्तीचे NPS आणि अटल पेन्शन योजनेत दुसरे खाते असू शकते. ( हे ही वाचा :- DEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी)

 

 NPS नुसार कशी मिळवाल दोन लाखांपर्यतची पेंशन:-

जर कोणी NPS मध्ये 40 वर्षांपर्यंत दरमहा 5,000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली तर त्याला निवृत्तीच्यावेळी 1.91 कोटी रुपये मिळू शकतात. तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असे गृहीत धरू, तुम्हाला एकरकमी मॅच्युरिटी पेमेंटमध्ये सुमारे रु. 1.91 कोटी आणि वार्षिकी मूल्यामध्ये रु. 1.27 कोटी मिळतील. जे मासिक पेन्शनसाठी ऍन्युइटीमध्ये पुन्हा गुंतवले जातील. म्हणून  6% वार्षिक परतावा गृहीत धरून. 1.27 कोटी आणि मासिक पेन्शन रु. 63,768. गुंतवणूकदारास दरमहा  मिळत राहील.


Show Full Article Share Now