DEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी
DRDO Job Salary at 7th Pay commission | (Photo credit: archived, edited, symbolic images)

DEBEL, DRDO ने मोठ्या पदावरील भरतीची घोषणा केली असुन उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवार DRDO च्या अधिकृत साइट drdo.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा उमेदवारांना सरकारी नोकरीची एक मोठी संधी आहे.डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑरगनायजेशन (DRDO) ने जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF - Junior Research Fellowship) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्जासाठी फक्त बारा दिवस शिल्लक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 ही निश्चित करण्यात आली आहे.

 

DRDO द्वारे शिकाऊ उमेदवारांच्या 7 जागा भरल्या जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार hrd.debel.debel@gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 जुलैपासून सुरु झाली असुन 15 जुलै 2022 पर्यत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.( हे ही वाचा :- Assembly Speaker Election: हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य)

 

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी नेट/गेट पात्रतेसह फस्ट क्लासमध्ये अभियांत्रिकी BE किंवा B.Tech असणे अनिवार्य आहे. प्राप्त केलेली सर्व पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांमधून आवश्यक आहेत.  पदासाठीची वयोमर्यादा  जाहिरातीच्या शेवटच्या तारखेप्रमाणे उमेदवाराची वयोमर्यादा 28 वर्षे आहे. 28 वर्षे वयापेक्षा अधिक वय असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.

 

किती स्टायपेंड मिळेल?

सुरुवातीच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी, नियमांनुसार ₹31,000 च्या मासिक वेतनासह घरभाडे देण्यात येईल.

 

निवड प्रक्रिया कशी असेल?  

अर्जांची तपासणी योग्यरित्या स्थापन केलेल्या स्क्रिनिंग समितीद्वारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतीचे वेळापत्रक ईमेलद्वारे सूचित केल्या जाईल.   इंजिनिअरींग झालेल्या विद्यार्थांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असुन 15 जुलै 2022 पर्यंत hrd.debel.debel@gov.in या वेबसाईट वरुन अर्ज भरु शकतात.