Assembly Speaker Election: हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
CM Eknath Shinde (PC - ANI)

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election) भाजप नेते राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले आहेत. मात्र यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे.  विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून येथे आलेले  एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत हे सरकार वाटचाल करत आहे. हेही वाचा Maharashtra Assembly Speaker Polls: भाजपाच्या Rahul Narwekar यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

शिंदे म्हणाले की, माझे काही सहकारी आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्धव छावणीतील काही लोक करत होते, तुम्ही माझे नाव सांगा, मी त्यांना विमानाने पाठवतो, असे सांगितले. मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पीएम मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.