Close
Search

Aadhaar Card: आता जन्मताचं मिळणार बाळाचे आधारकार्ड, प्रशासनाचा मोठा निर्णय

आता बाळाचा जन्म होताचं त्या बाळाचे आधारकार्ड काढणं अनिवार्य असणार आहे, असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहे.

माहिती Snehal Satghare|

Aadhar Card (Photo Credits-Twitter)

आता देशात आधारकार्ड असणं अत्यंत गरजेच झालं आहे. सर्वसामान्य असो सेलिब्रिटी वा राजकीय नेता सगळ्यांकडे आधारकार्ड असणं बंधनकारक आहे. तरी आता बाळाचा जन्म होताचं त्या बाळाचे आधारकार्ड काढणं अनिवार्य असणार आहे, असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहे. सध्या हा निर्णय फक्त नागपूर जिल्ह्यात लागू असला तरी येणाऱ्या काहीच दिवसांत हा निर्ण संपूर्ण राज्यात लागू होवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशानुसार आता इस्पितळात बाळ जन्मताचं बाळाचं आधार कार्ड काढल्या जाणार आहे. बाळाचा जन्म शासकिय निमशासकीय वा खासगी इस्पितळात झाला तरी अगदी सोप्या पध्दतीने नवजात बालकाचं आधारकार्ड काढणं शक्य होणार आहे. तरी आरोग्य विभाग आणि पोस्ट विभाग यांच्या समन्वयाने जन्मलेल्या बाळाची आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. तरी तुमच्या घरी वा तुमच्या प्रियजनांच्या घरी नवजात शिषु असल्याचं लवकरचं त्याचे आधार कार्ड काढणं शक्य होणार आहे.

रुग्णालय प्रमुखांनी आधारकार्ड प्रक्रीया (Aadhar Card Procedure) कार्याचा मासिक अहवाल विहित नमुन्यामध्ये दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक नवजात बालकाचे (Newborn Baby) आधारकार्ड नोंदणीसाठी (Aadhar Card Registration) रुग्णालयांच्या प्रमुखांनी आणि पोस्ट ऑफिस (Post Office) कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Aadhaar Mitra: UIDAI ने लॉन्च केला नवा चॅटबोट; पहा कशी करणार मदत?)

बाळाचे जन्म झाल्यावर इंडिया पोस्ट पेंमेंट बँक (India Post Payment Bank) आधार नोंदणी (Aadhar Registration) कर्मचाऱ्यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड (Aadhar Card) तात्काळ काढून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बालकांची संबंधित संस्थाप्रमुखांना गुगल शिटमध्ये परिपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. संस्थेला संबंधित फॉर्म क्रमांक एक भरून कार्यक्षेत्रातील झोन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागास सादर करावा लागणार आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change