Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

UIDAI कडून आज (4 नोव्हेंबर) नवं AI/ML chatbot लॉन्च करण्यात आले आहे. या चॅटबोटचं नाव "Aadhaar Mitra"आहे. या चॅटबोटच्या माध्यमातून भारतीयांना आधारकार्ड संबंधीच्या सुविधा अधिक सुकर पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. या चॅटबोट च्या माध्यमातून नागरिकांना अ‍ॅटोमॅटिक रिस्पॉन्स मिळणार आहे. ज्याचा फायदा त्यांना आधारकार्ड च्या अपडेट्समध्ये होईल. UIDAI website च्या में पेज वरच ही सुविधा देण्यात आली आहे. "Ask Aadhaar" आयकॉनवर क्लिक केल्यानंतर हा चॅटबोट तुमच्याशी संवाद साधायला सुरूवात करणार आहे.

चॅटबोट मदत कशी करणार?

UIDAI च्या माहितीनुसार, आधार चॅटबोट हा आधार निगडीत विषय, फीचर आणि सेवा यांच्याबद्दल उत्तमप्रकारे प्रशिक्षित आहे. युजर्सने आता त्यांच्यामनातील प्रश्न टाईप करायचा आहे आणि त्यावर त्यांना उत्तर चॅटबोट कडून दिले जाईल. UIDAI ने केलं अलर्ट, फ्रॉड पासून दूर राहण्यासाठी Aadhar Card असं ठेवा सुरक्षित .

नव्या चॅटबोट मध्ये काही सेवा या अपग्रेड करण्यात आल्या आ हेत. त्यामध्ये आता आधार पीव्हीसी कार्ड ट्रॅक करता येणार आहे. सोबतच आधार एनरोलमेंट/ अपडेट स्टेटस पाहता येणार आहे. सोबतच नागरिकांना बोट चा वापर करून त्यांच्या तक्रारी करता येतील. तक्रारींचा फॉलो अप देखील घेता येणार आहे.

UIDAI येत्या काळामध्ये Open-Source CRM solution उपलब्ध करून देण्याच्याही विचारामध्ये आहे. नवं Customer Relationship Management solution हे अत्याधुनिक फीचर्सने सज्ज असणार आहे. अशी माहिती देखील Ministry of Electronics & IT ने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात आहे.

new CRM solution मध्ये अनेक चॅनल्स असतील. ज्यात फोन कॉल, इमेल, चॅटबोट,वेब पोर्टल, सोशल मीडीया,लेटर आणि वॉक इन असेल. म्हणजे तक्रारदार त्यांची तक्रार नोंदवू शकतो, तिचा फॉलो अप घेऊ शकतो. अधिक सक्षमतेने प्रश्न सोडवू देखील शकतो. एका आठवड्यामध्ये UIDAI अंदाजे 92% CRM complaintsहाताळू शकतात.