Positive Pay System:1 जानेवारी 2021 पासून बदलणार्‍या चेक पेमेंटच्या नियमांबद्दल जाणून घ्या नवी नियमावली
New cheque payment rules applicable from January 1, 2021 | Representational Image (Photo Credits: Pixabay)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून 'positive pay system'लागू केली जाणार आहे. यामध्ये आता 50 हजार पेक्षा अधिकच्या रक्कमेचे चेक व्यवहार करताना माहिती पुन्हा तपासली जाणार आहे. हा नवा नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू केला जाणार आहे. चेक पेमेंट दरम्यान ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रयत्न केले आहेत. दरम्यान याबाबत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती.

positive pay system म्हणजे काय?

पॉझिटिव्ह पे हा ऑटोमेटेड फ्रॉड डिटेंशन टूल आहे. यामध्ये चेक क्लिअरिंगमध्ये आल्यानंतर चेक नंबर, चेक डेट, ज्याला चेक द्वारा पैसे दिले जाणार त्याचे नाव, अकाऊंट नंबर, अमाऊंट आणि इतर तपशील पाहिले जाणार आहेत.

positive pay system द्वारा बदलणारे चेक पेमेंट मधील नियम काय असतील?

  • positive pay system द्वारा मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांमध्ये महत्त्वाचे डिटेल्स तपासले जाऊ शकतात.
  • चेक देणार्‍या व्यक्तीला SMS, इंटरनेट बॅंकिंग, एटीएम, मोबाईल अ‍ॅपच्या द्वारा काही महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर CTS द्वारा जर काही गडबड किंवा माहिती मॅच झाली नाही तर दोन्ही बॅंकांना त्याची माहिती दिली जाईल.
  • नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून पॉझिटिव्ह पे सिस्टमसाठी सीटीएसमध्ये ही नवीन सुविधा निर्माण केली जाणार आहे. नंतर ती बँकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • दरम्यान या सुविधेचा लाभ घेणे खातेधारकावर अवलंबून असणार आहे.
  • 50 हजारांच्या पुढील रक्कमेसाठी हा नियम लागू असणार आहे. पण बॅंका 5 लाखाच्या वरील नियमांसाठी हा नियम अंमलात आणू शकतात.आरबीआयच्या माहितीनुसार, आता अधिकाधिक व्यवहार सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या नव्या बदलाच्या अंमलबजावणीची माहिती बॅंकांना येत्या काळात ग्राहकांपर्यंत पोहचवायची आहे. त्यामुळे त्याचा एमएसएम, इमेल लवकरच ग्राहकांना मिळू शकतो.