India-Pakistan tension: भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तान गांगरुन (Pakistan) गेला आहे. गांगरलेल्या अवस्थेत त्याने भाराताल धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, भारतावर हल्ला करण्याचे वक्तव्यही केले आहे. या वक्तव्यावरुन महासत्ता अमेरिकेनेही पाकिस्तानला योग्य शब्दात समज देत कान उपटले आहेत. दहशतवाद्याच्या मुद्द्यावर अवघे जग विरुद्ध पाकिस्तान असे चित्र आहे. तरीही पाकिस्तान युद्धाची भाषा करतो. अर्थात युद्धाची धमक पाकिस्तानमध्ये नाही. परंतू, तरीही समजा युद्ध झालेच तर भारतासमोर (India) पाकिस्तानचा किती टिकाव लागू शकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीचा घेतलेला हा आढावा.
जगभरातील अनेक देशांच्या लष्करी शक्तीचा वार्षीक अभ्यास करुन अहवाल मांडणारी संस्था ग्लोबल फायर पॉवर ही जगात प्रसिद्ध आहे. ग्लोबल फायर पॉवर संस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या लष्करी शक्तीसमोर पाकिस्तानचा टिकाव लागणे मुश्कील आहे. पाकिस्तान लष्कराच्या कोणत्याही तुलनेत भारताची लष्करी ताकद दुप्पट आहे. ग्लोबल फायर पॉवरने 2018 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
दोन्ही देशांची तुलनाच करायचे म्हटले तर, पाकिस्तानकडे एकूण 1,281 लढाऊ विमाने आहेत. तर, भारताकडे लडाऊ विमानांची संख्या आहे, 2,185. भारताकडे 4,426 टॅंक आहेत. तर, पाकिस्तानकडे केवळ 2182 टँक आहेत. 136 देशांच्या लष्करी क्षमतेच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पाकिस्तान 17 व्या क्रमांकावर आहे. (अधिक सविस्त वृत्तासाठी हेही वाचा, भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास काही तासांत होऊ शकतो पाकचा पराभव; जाणून घ्या किती आहे दोन्ही देशांची सैन्य शक्ती)
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांची एकूण लष्करी क्षमता |
||
विभाग |
भारत |
पाकिस्तान |
जवान |
13.6 लाख |
6.37 लाख |
टँक |
4426 |
2182 |
युद्धनौका |
295 |
197 |
लढावू विमान |
2185 |
1281 |
हेलिकॉप्टर |
720 |
328 |
संरक्षण खर्च |
41 ट्रिलीयन 23 अब्ज रुपये |
7 ट्रिलियन 81 अब्ज रुपये |
पाकिस्तानच्या तुलनेत भारताची संरक्षणावर अर्थसंकल्पीय कैक पटीने अधिक
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) ने दिलेल्या माहितीनुसार, भारत आपल्या 14 लाख सक्रिय जवानांवर 58 अब्ज डॉलर