Important Deadlines in September 2023: मोफत आधार कार्ड अपडेट ते 2000 नोटा बदलण्याची डेड्लाईन जाणून घ्या महिन्यातील नवे बदल
Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

आज नव्या महिन्याला सुरूवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात आता आर्थिकदृष्ट्या नवनवे बदल झाले आहेत. हे बदल सर्वसामान्यांच्या खिशाला फटका पाडणारे असल्याने तुम्हांला या महिन्यापासून होणारे बदल ठाऊक असणं आवश्यक आहे. यामध्ये मोफत आधार अपडेट्स ते क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स च्या डेडलाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत. 2000 च्या नोटा बदलण्याची डेडलाईन येत आहे. त्यामुळे यामधील तुमच्याशी निगडीत कोणकोणत्या बाबी लागू होत आहेत हे पाहून पुढील निर्णय घ्या. Rule Change From 1st September: एक सप्टेंबरपासून देशभरात बदलणार महत्त्वाचे नियम, खिशावर भार पडण्यापूर्वीच घ्या जाणून .

आधार अपडेट ची डेडलाईन

UIDAI कडून आधार कार्ड्स चे तपशील अपडेट करण्यासाठी मुदत अजून 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. जून महिन्यापर्यंत असलेली डेडलाईन आता 14 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. myAadhaar portal वर 15 सप्टेंबर नंतर हेच अपडेट्स करण्यासाठी शुल्क आकारले जातील.

2000 च्या नोटा बदलण्यासाठी डेडलाईन

आरबीआय कडून 2 हजारांच्या नोटा बदलून देण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता ज्या लोकांकडे 2 हजारची नोट आहे त्यांना ती बॅंकेत जमा करण्याची किंवा पैसे बदलून घेण्याची मुदत 30 सप्टेंबर आहे.

डिमॅट नॉमिनेशन डेडलाईन

SEBI कडून आता डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट होल्डर्सला आता नॉमिनेशन देणं आवश्यक आहे. यासाठी देखील 30 सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आली आहे. ज्यांना नॉमिनेशन द्यायचं आहे त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे तर ज्यांना हा ऑप्शन द्यायचा नाही त्यांना तो नाकारण्याचा देखील पर्याय आहे.

सेकंड अ‍ॅडव्हान्स टॅक्स डेडलाईन

2023-2024 या आर्थिक वर्षासाठी advance tax चा दुसरा हप्ता 15 सप्टेंबर 2023 रोजी भरावा लागणार आहे. ही आवश्यकता सर्व करदात्यांना लागू होते ज्यांचे वर्षासाठी अनुमानित कर दायित्व रु. 10,000 किंवा त्याहून अधिक आहे, कर कपात आणि स्रोतावरील संकलन लक्षात घेऊन (TDS आणि TCS), आयकर कायदा 1961 च्या कलम 208 द्वारे निर्धारित केल्यानुसार लागू असेल.

हे लक्षात घेतले पाहिजे की 1 सप्टेंबर 2023 पासून, अॅक्सिस बँक तिच्या प्रसिद्ध मॅग्नस क्रेडिट कार्डला आकार देणारे बदल अंमलात आणण्यासाठी सज्ज आहे. या पुनरावृत्तींमध्ये रिवॉर्ड पॉइंट्सच्या मूल्यातील बदल आणि रिवॉर्ड पॉइंट सिस्टममधून काही पेमेंट श्रेणी काढून टाकणे समाविष्ट आहे.