PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

पॅन (PAN) आणि आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्त्वाचे ओळखपत्र आहेत. बँकेची काम करण्यासाठी तसंच इन्कम टॅक्स रिटर्न, गुंतवणूकीसह अनेक ठिकाणी ही ओळखपत्र कामी येतात. दरम्यान, ही कार्ड एकमेकांना लिंक असणे अनिवार्य आहे. यासाठी देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास ते इनव्हॅलिट ठरणार आहे. यापूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यात 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

त्यामुळे आता 31 मार्च 2021 पर्यंत पॅन-आधार कार्डशी लिंक न केल्यास 1 एप्रिल 2021 पासून ते इन्व्हॅलिड ठरणार आहे. त्यानंतर पॅनकार्ड कुठेच वापरता येणरा नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करणे गरजेचे आहे. दरम्यान, सध्या पॅन-आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी पॅन कार्ड वापरता येईल. (31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा)

आधार-पॅन लिंक कसे कराल?

# ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.

# त्यातील 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.

# तिथे पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.

# एकदा सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर क्लिक करुन सब्मिट बटण दाबा.

आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक करण्यासाठी 56161 किंवा 567678 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज करा. यासाठी UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN> असा मेसेज करा. उदा. तुमचा आधार कार्ड नंबर 586738291086 असेल आणि पॅन कार्ड नंबर KBJH11234M असेल. तर मेसेज UIDPAN 586738291086 KBJH11234M असा टाईप करा आणि मेसेज 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा.