IRCTC Destination Alert Service: रेल्वे प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशन पूर्वी 'अलर्ट' करणारी रेल्वेची सेवा नेमकी सेट कशी करायची?
Indian Railways (Photo Credits: PTI)

रेल्वे प्रवाशांच्या बदलत्या गरजांनुसार, आता IRCTC कडून सोयी-सुविधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नुकतीच रेल्वे प्रवाशांना आता त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशन पूर्वी अलर्ट करणारी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. Destination Alert Service असं त्याचं नाव आहे. यामध्ये आयआरसीटीसी प्रवाशांना किमान 20 मिनिटं आधी अलर्ट करतं त्यामुळे झोपून राहिल्यास आपलं स्टेशन सुटण्याची डोकेदुखी नको असल्यास तुम्ही या सेवेचा नक्की लाभ घेऊ शकता. ही सुविधा सशुल्क असल्याने नेमकी ती कशी सेट करायची हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर खालील माहिती नक्की वाचा.

डेस्टिनेशन अलर्ट या सेवेमध्ये प्रवाशांना मोबाईल वर एक एसएमएस आणि किमान 20 मिनिटं आधी वेक अप कॉल दिला जाणार आहे. रात्रीचा प्रवास करणार्‍यांसाठी ही सेवा प्रामुख्याने सुरू करण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: IRCTC Luggage Rules: रेल्वे प्रवाशांवरही सामान सोबत नेण्यावर मर्यादा; अधिक लगेज घेऊन प्रवास करताना आढळल्यास होणार दंड .

कशी सेट कराल डेस्टिनेशन अलर्ट सेवा?

  • डेस्टिनेशन अलर्ट सेवा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल वरून 139 डाईल करा.
  • त्यानंतर तुम्हांला भाषेचा पर्याय विचारला जाईल. योग्य नंबर प्रेस करून भाषा निवडा.
  • IVR मेन मेन्यू मधील 7 चा पर्याय निवडा.
  • डेस्टिनेशन अलर्ट साठी 2 दाबा.
  • 10 अंकी पीएनआर नंबर डाईल करा. त्यानंतर कंफर्म करण्यासाठी 1 दाबा.
  • तुमची डेस्टिनेशन अलर्ट सेवा बूक झाली की त्याचा मेसेज मोबाईल वर येणार आहे.

याशिवाय केवळ Alert हा मेसेज 139 वर पाठवून देखील तुम्ही सहज डेस्टिनेशन अलर्ट सेवा बूक करू शकता.

दरम्यान यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्या नंबर वरून तुम्ही कॉल कराल किंवा मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हांला ही अलर्ट सेवा मिळणार आहे. तसेच ही सेवा रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेतच उपलब्ध असणार आहे.