बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रीया एटीएम (ATM) च्या माध्यमातून अधिक सुकर झाली आहे. परंतु, काही वेळेस पैसे काढण्याची प्रोसेस पूर्ण होऊन देखील पैसे हातात येत नाहीत. अकाऊंटमधून पैसे कट झाल्याचा मेसेजही मोबाईलवर येतो. मात्र पैसे हाती पडत नाहीत. त्यामुळे नागरिक घाबरुन, गोंधळून जातात. परंतु, अशा प्रकारच्या परिस्थितीत घाबरुन जाण्याची गरज नाही. आता कट झालेले पैसे तुम्हाला अगदी सहजरित्या परत मिळतील. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे, आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रीया अयशस्वी झाल्यास एका ठराविक वेळेत अकाऊंटमध्ये पैसे परत येतात. परंतु, पैसे परत न आल्यास त्या बँकेला त्याची भरपाई करावी लागेल. आरबीआयच्या साईटवर अनेकदा नागरिकांकडून विविध प्रश्न विचारले जातात. एटीएम संबंधित विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे. (ATM च्या रांगेत उभे न राहता SBI ADWM मधून काढू शकता पैसे; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स)
RBI Tweet:
.@RBI Kehta Hai..
If the amount debited due to a failed transaction is not reverted to your account within a specified time, your bank would compensate you for the delay.#BeAware #BeSecure#rbikehtahai #StaySafehttps://t.co/mKPAIp5rA3 @SrBachchan pic.twitter.com/lYiM6GAUy6
— RBI Says (@RBIsays) October 7, 2020
एटीएम ट्राजेक्शन अयशस्वी ठरल्यास रिफंड मिळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:
# अशा प्रकारचे व्यवहार बँकेने स्वतःच्या जबाबदारीवर हाताळायला हवे.
# नागरिकांनी तातडीने याची माहिती बँक आणि एटीएम (दुसऱ्या बँकेचे एटीएम असल्यास) ला द्यायला हवी.
# RBI नुसार, एटीएम ट्राजेक्शन अयशस्वी झाल्यास व्यवहाराच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणे अनिवार्य आहे.
# 5 दिवसांच्या आत अकाऊंटमध्ये पैसे जमा न झाल्यास दररोज 100 रुपयांच्या हिशोबाने पैसे परत करावे लागतील.
# ग्राहक बँकेला संपर्क करु शकतात.
# बँकेकडून 30 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास ग्राहक बँकींग लोकपालकडे जावू शकतात.
त्यामुळे एटीएम मधून पैसे काढताना तुमच्यावर अशी वेळ आली तर घाबरुन न जाता या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे पैसे परत मिळवा.