Representational Image | (Photo Credits: Pixabay)

How To Withdraw Cash From SBI ADWM: एटीएम (ATM) मधून पैसे काढणे सोयीचे आहे. मात्र त्यासाठी लावावी लागणारी मोठी रांग कंटाळवाणी ठरते. परंतु, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांचा हा त्रास देखील दूर केला आहे. एसबीआयने (SBI) ग्राहकांसाठी नवी सुविधा आणली आहे. आता तुम्ही एसबीआयच्या ऑटोमेटेड डिपॉजिट एंड विथड्रॉल मशीन मधूनही पैसे काढू शकता. ADWM देखील एटीएम प्रमाणे कामं करतं. या मशिनद्वारे तुम्ही पैसे टाकण्याचे आणि काढण्याचे काम अगदी कमी वेळात करु शकता. (SBI Recruitment 2020: एसबीआय मध्ये 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी पदाची भरती; 'असा' करा अर्ज)

ADWM मशिनचा वापर करणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला मशीनमध्ये केवळ कार्ड स्वाईप करुन पिन टाकायचा आहे. त्यानंतर पैसे तुम्हाला मिळतील. याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे दिली आहे. त्या ट्विटमध्ये SBI ने म्हटले, ADWM असल्यावर एटीएमच्या रांगेत उभे राहण्याची काय गरज? या ट्विटमध्ये 22 सेकंदांची एक व्हिडिओ क्लिप देखील आहे. आपण सर्वांनी आतापर्यंत या मशीनचा वापर कॅश भरण्यासाठी केला आता याचा वापर तुम्ही पैसे काढण्यासाठी देखील करु शकता, असे या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

State Bank of India Tweet:

SBI ADWM द्वारे पैसे कसे काढाल?

# डेबिट कार्ड (Debit Card) घेऊन SBI ADWM मध्ये जा.

# ADWM मध्ये तुमचे कार्ड टाका. स्क्रिनवर येणाऱ्या पर्यायातून बँकींग पर्याय निवडा.

# त्यानंतर तुम्हाला सोयीस्कर असेल अशा भाषेची निवड करा आणि 'Next' बटण दाबा.

# तुमचा एटीएम पीन नंबर टाका.

# स्क्रीनवरुन कॅश विथड्रॉल (Cash Withdrawal) चा पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.

# त्यानंतर तुम्हाला हवी असलेली रक्कम टाईप करा. ADWM च्या शटरमधून पैसे बाहेर येतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताभर तब्बल 13,000 हून अधिक ADWM मशिन स्थापित केल्या आहेत. तर 18 सप्टेंबर पासून एसबीआय ओटीपी आधारित कॅश काढण्याची सुविधा एटीएमवर 24 तास सुरु आहे. मात्र 10 हजाराहून कमी पैसे काढण्यासाठी या सुविधेचा वापर करता येणार नाही.