SBI Recruitment 2020: एसबीआय मध्ये 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी पदाची भरती; 'असा' करा अर्ज
SBI (Photo Credits: Facebook)

SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) शुक्रवारी विविध तज्ज्ञ संवर्गातील अधिकारी असलेल्या 92 रिक्त पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतात.

इच्छुक तसेच पात्र उमेदवार sbi.co.in/career वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, डेटा संरक्षण अधिकारी आणि जोखीम तज्ञ या पदांचा समावेश आहे. (हेही वाचा - Bank of India Recruitment 2020: सरकारी नोकरीची संधी, बँक ऑफ इंडिया भरणार रिक्त 200 जागा, पगार, पात्रता, अर्ज यांविषयी घ्या जाणून)

स्टेट बँक ऑफ इंडियामधील रिक्त पदांची संख्या तसेच शैक्षणिक पात्रता -

1. उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) - 11 पदे.

शैक्षणिक पात्रता- बी.टेक / एमटेक मध्ये संगणक विज्ञान / आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

2. व्यवस्थापक (डेटा वैज्ञानिक) - 11 पदे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे, 5 वर्षे अनुभव.

3. उपव्यवस्थापक (सिस्टम अधिकारी) - 5 पदे.

शैक्षणिक पात्रता- उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) प्रमाणेच आहे.

4. डेटा संरक्षण अधिकारी - 1 जागा

पात्रता - 15 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर डिग्री.

याशिवाय रिस्क स्पेशियलिस्ट - 19 पदे, पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट स्केल II – 3 पदे, मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट) - 5 पदे, डिप्टी मॅनेजर (सिक्योरिटी) - 28 पद, असिसमेंट जनरल मॅनेजर - 1 जागा, वरिष्ठ सलाहकार विश्लेषक - 1 जागा, डेटा ट्रांसलेटर - 1 जागा आणि डेटा ट्रेनर - एक जागा. अशा पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वरील पदांवर काम करण्यासाठी उमेदवारांना ही सुर्वण संधी आहे.

दरम्यान, या भरतीप्रक्रियेच एक व्यक्ती फक्त एकाच पदासाठी अर्ज करु शकतो. यासंदर्भात एसबीयाने नियम जारी केला आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांना 750 रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. तर अनुसूचित जाती / जमाती / पीएच उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. उमेदवार परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतो.