फोटो सौजन्य- Pixabay

गुजरातमध्ये एका बड्या कापड व्यापाराची दोन मुले संन्यासधर्म स्वीकारणार आसल्याचा चर्चा सुरतमध्ये चालू आहे. तसेच येत्या 9 डिसेंबरला हे दोघे बहिण- भाऊ सर्व गोष्टींचा त्ययाग करुन हा मार्ग स्वीकारणार आहे.

यश वोरा आणि दीक्षा वोरा असं या दोघांचे नाव असून ते सुरतमध्ये राहतात. तसेच त्यांच्या वडिलांचा मोठा कापड व्यवसाय आहे. लहानपणापासूनच ऐशोआरामाचे आयुष्य या दोघांनी अनुभवलेले आहे. तर दोघे ही उच्च शिक्षित आहेत. मात्र यश आणि दीक्षा यांना आता अधात्म्याचा ध्यास लागला आहे. तसेच सुरतमधील पूज्य आचार्य भगवान यशोवरम सुरिश्रवरर महाराज यांच्याकडून त्यांनी धार्मिक शिक्षणसुद्धा घेतले आहे. त्यामुळे यश हा साधू आणि दीक्षा संन्यासी बनणार असल्याचे या दोघांनी घोषित केले आहे.

परंतु या दोन्ही मुलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांच्या वडिलांना विचारले असता, 'मला माझ्या दोन्ही मुलांनी घेतलेल्या निर्णयाचा अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले आहे'. तसेच त्यांना अजून एक लहान मुलगा असून त्याला ही आध्यात्म्याच्या मार्गावर जाताना पाहायचे आहे असे त्यांनी मत मांडले आहे.