लग्नाचा सिझन सुरु होण्याआधी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold, Silver Price) बरीच चढ-उतार दिसून येत आहेत. या महिन्यात सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 1670 10 ग्रॅम रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर चांदीचा दर प्रतिकिलो 3892 रुपयांनी कमी झाला आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम साठी 46570 रुपये आणि चांदीचा दर 68621 रुपये किलो असा होता. आज म्हणजे 25 मार्च गुरुवारी देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची विक्री 14 रुपयांच्या वाढीने 44,900 रुपयांमध्ये होत आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरात किलोमागे 371 रुपयांची घसरण दिसून येत आहे. आज सराफा बाजारात चांदी 65732 रुपये प्रती किलो विकली जात आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, यंदा जूनपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. या वर्षाच्या अखेरीस सोने 48 ते 50 हजारांच्या दरम्यान राहू शकेल असे त्यांनी सांगितले.
देशातील महत्वाच्या शहरातील सोन्याचे भाव –
मुंबई - 45,020 रुपये
दिल्ली - 48,060 रुपये
चेन्नई - 46,140 रुपये
कोलकाता - 46,870 रुपये
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती. त्यावेळी कोरोना साथीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता मागच्यावर्षीपेक्षा सोन्याचे दर बरेच खाली आहेत. महत्वाचे म्हणजे 2021 मध्ये त्यात जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून आली नाही. आता होळी सणाच्या आधीही सोन्या-चांदीचे भाव स्थिरच आहेत.
दरम्यान, दरम्यान, IBJA ने जारी केलेला दर देशभरात सर्वत्र स्वीकारला जातो. मात्र, या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता. मात्र सोने-चांदीचा सध्याचा दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो.