Aadhaar Card (Image: PTI/File)

आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आधार कार्ड (Aadhaar Card) अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी UIDAI ने जारी केली आहे. नागरिकांना त्यांचे बँक अकाऊंट (Bank Account) किंवा पासपोर्ट (Passport) साठी अर्ज करायचा असल्यास आधार कार्डमध्ये अचूक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड मधील नाव किंवा जन्म तारीख चुकीची असल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (Aadhaar Card Update: आधार कार्ड बाबत UIDAI ने वेबसाईट वरून बंद केल्या 'या' दोन सुविधा; इथे पहा अधिक माहिती)

UIDAI ने दिलेल्या यादीनुसार, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ओळखपत्र म्हणून 5 कागदपत्रं ग्राह्य धरली जातील. रिलेशनशीपचा पुरावा म्हणून 4 कागदपत्रं, जन्मतारखेसाठी 5 आणि रहिवासी पत्त्यासाठी एकूण 9 कागदपत्रं ग्राह्य धरली जातील. (तुमच्या Aadhaar Card वरुन इतर कोणी SIM घेतले आहे का? 'या' पद्धतीने घ्या जाणून)

प्रुफ ऑफ आयटेंडीटी साठी ग्राह्य असलेली कागदपत्रं:

1. पासपोर्ट

2. पॅनकार्ड

3. रेशनकार्ड

4. मतदानपत्र

5. ड्रायव्हिंग लायसन्स

प्रुफ ऑफ अॅड्रेससाठी ग्राह्य असलेली कागदपत्रं:

1.पासपोर्ट

2. बँक स्टेटमेंट

3. पासबुक

4. रेशनकार्ड

5. पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट

6. मतदानपत्र

7.ड्रायव्हिंग लायसन्स

8. विजेचे बिल

9. पाण्याचे बिल

रिलेशनशीपसाठी ग्राह्य असलेली कागदपत्रं:

1. पासपोर्ट

2.पेन्शन कार्ड

3.आर्मी कॅटिन कार्ड

4.मनरेगा जॉब कार्ड

जन्मतारखेसाठी ग्राह्य असलेली कागदपत्रं:

1. जन्म दाखला

2. पासपोर्ट

3.पॅन कार्ड

4. गुणपत्रिका

5. SSLC Book/Certificate

Aadhaar Tweet:

आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI ने अधिकृत करुन दिलेल्या केंद्राला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला जुन्या आधार कार्डची कॉपी, आधार कार्ड अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रं सोबत बाळगावी लागतील.