Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाची किंमत 2014 नंतर प्रथमच $100 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. रशिया-युक्रेन संकटाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर या प्रदेशातील महत्त्वपूर्ण ऊर्जा निर्यातीत व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो प्रामुख्याने युरोपियन रिफायनरींना क्रूडची विक्री करतो. रशिया हा युरोपला नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार करणारा देश आहे.

सध्या कच्च्या तेलाच्या वाढीला युक्रेन-रशिया संकट जबाबदार आहे. परंतु या व्यतिरिक्त, काही तेजीचे मूलभूत तत्त्वे आहेत. जे किमती उच्च ठेवू शकतात. मंदीच्या दिशेने, या वर्षाच्या शेवटी जेव्हा इराणच्या तेल निर्यातीवर यू.एस. इराण आण्विक करारामुळे तेलाच्या किमती $90 किंवा $90 च्या खाली जाऊ शकतात. (वाचा -Ukraine Russia Crisis: रशिया युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 2000 अंकांपेक्षा अधिक, निफ्टी सुमारे 600 अंकांनी घसरला)

भारतावर युक्रेन-रशिया संकटाचा परिणाम -

सध्याचे संकट भारतासाठीही महत्त्वाचे आहे, कारण ते कच्च्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशांतर्गत किंमती वाढू शकतात, ज्यामुळे महागाई वाढू शकते. कोविड महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात पेट्रोल, डिझेल आणि इतर प्रकारच्या इंधनाची मागणी जोर धरू लागली आहे. देशात खप वाढला तर थेट देशाची आयात वाढेल. त्यामुळे बजेट विस्कळीत होऊन वित्तीय तूट अनियंत्रित होऊ शकते.

दरम्यान, युक्रेनमध्ये युद्ध घोषित केल्याने गॅसच्या किमतीवर अनेक पटींनी परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम एप्रिलपर्यंत दिसू शकतो. झी न्यूज हिंदीच्या अहवालानुसार, विश्लेषकांनी सांगितले की, किंमत 2.9 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरून $ 6-7 डॉलर पर्यंत जाऊ शकते.