Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

ChatGPT ने image generation capabilities मागील आठवड्यामध्ये खुल्या केल्या आहेत. यानंतर इंटरनेट वर झपाट्याने क्रिएटीव्ह इमेजेस बनवण्यास सुरूवात झाली आहे. Studio Ghibli-style portraits ची क्रेझ असताना जशी त्याची क्रिएटीव्ह बाजू सामान्यांना भूरळ पाडत आहे तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करून काही जण चूकीच्या गोष्टी बनवून त्याचा गैरवापर करत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे या दुधारी शस्त्राबद्दल सावध राहण्यात शहाणपण आहे.

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी, ज्यामध्ये मुले आणि नवजात बालकांचाही समावेश आहे, 12 अंकी unique identity नंबर आहे. सरकार म्हणते की ते "डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीचा uniqueness निर्माण करते." प्रत्येक व्यक्तीला एक unique Aadhaar ID number दिला जातो.

Aadhaar card खरं की खोट कसं ओळखावं?

  1. पासपोर्ट साईझ फोटो पहा. तुम्ही अपलोड केला असला तरीही AI-generated images मध्ये तो थोडा वेगळा दिसेल.
  2. फेक आधार कार्ड वरील हिंदी/ इंग्लिश फॉन्ट बघा. तुम्हांला फरक जाणवेल.
  3. आधारची रचना तपासा - ज्यामध्ये कोलन, स्लॅश आणि स्वल्पविरामांची जागा बघा.
  4. आधार आणि भारत सरकारचे लोगो काळजीपूर्वक तपासा. त्यामध्ये तुम्हांला फरक जाणवेल.
  5. आधार कार्डवर QR कोड आहे का ते पहा. जर तो असेल तर तो खरा आहे का ते तपासण्यासाठी स्कॅन करून घ्या.

UIDAI website वर आधार व्हेरिफाय कसं कराल?

  • uidai.gov.in, myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar यावर तुम्ही आधार कार्ड तपासून पाहू शकाल.
  • स्टेप 1: myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar ला भेट द्या.
  • स्टेप 2: "Check Aadhaar Validity" वर क्लिक करा.
  • स्टेप 3: आता 12 अंकी आधार नंबर टाका आणि कॅप्चा टाका.

जर आधार क्रमांक बनावट असेल, तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि वेबसाइट तुम्हाला valid Aadhaar number टाकण्यास सांगेल. तुम्ही valid number जोडला तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्ही हा टप्पा पार केला तर एक नवीन पान उघडेल ज्यामध्ये असे लिहिले असेल: "[Entered Aadhaar number] Exists"; "Aadhaar Verification Completed"

  • स्टेप 4: या स्क्रीनवरील तपशील कार्डवरील तपशील ज्यात नाव, राज्य, लिंग हे तपासून पहा.

Virtual Aadhaar for Privacy चा वापर करा

Virtual Aadhaar for Privacy Virtual ID वापरा. VID हा आधार क्रमांकाशी जोडलेला तात्पुरता, रद्द करता येणारा 16 अंकी random number mapped आहे. प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी सेवा केल्यावर आधार क्रमांकाऐवजी VID वापरता येतो. आधार क्रमांक वापरल्याप्रमाणेच VID वापरून authentication केले जाऊ शकते. VID वरून आधार क्रमांक काढणे शक्य नाही.