Bank Holidays in April 2024: मार्च महिना संपण्यासाठी केवळ दोन ते तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. पुढील आठवड्यापासून एप्रिल (एप्रिल 2024) महिना सुरू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिलमध्ये बँक हॉलिडे लिस्ट (Bank Holiday List) जारी केली आहे. RBI बँक हॉलिडे लिस्टनुसार एप्रिलमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत जर तुम्हीही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी (List of Bank Holidays) एकदा तपासून पहा.
एप्रिलमध्ये या दिवशी बँका बंद राहणार -
- 1 एप्रिल 2024: जेव्हा जेव्हा आर्थिक वर्ष संपते तेव्हा बँकेला संपूर्ण आर्थिक वर्षासाठी खाते बंद करावे लागते. आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद - आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, इम्फाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोहिमा, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद राहतील.
- 5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जुम्मत-उल-विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
- 9 एप्रिल 2024: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
- 10 एप्रिल 2024: कोची आणि केरळमध्ये ईदमुळेन बँका बंद राहील.
- 11 एप्रिल 2024: ईदमुळे देशभरात अनेक बँका बंद राहतील, परंतु, चंदीगड, गंगटोक, इंफाळ, कोची, शिमला, तिरुअनंतपुरम या बँका खुल्या राहतील.
- 15 एप्रिल 2024: हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला बँका बंद राहतील.
- 17 एप्रिल 2024: रामनवमी 17 एप्रिल रोजी आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका उघडणार नाहीत.
- 20 एप्रिल 2024: गर्या पूजेच्या निमित्ताने आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहणार -
प्रत्येक महिन्याच्या रविवारी, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवारी बँका बंद राहतात. एप्रिलमध्ये देशातील सर्व बँका 7 एप्रिल (रविवार), 13 एप्रिल (दुसरा शनिवार), 14 एप्रिल (रविवार), 21 एप्रिल (रविवार), 27 एप्रिल (4 था शनिवार) आणि 28 एप्रिल (रविवार) रोजी बंद राहतील. (वाचा -RBI's Major Material Supervisory Concerns: पेटीएम ते बॅंक ऑफ बडोदा मध्ये आरबीआय कडून नुकतेच घालण्यात आलेले महत्त्वाचे निर्बंध पहा!)
दरम्यान, बँक बंद असूनही ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. ग्राहक मोबाइल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकिंग सेवा वापरू शकतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. याशिवाय ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे सहज पेमेंट करू शकतात.