नागरिकांचं हित लक्षात घेता आणि आर्थिक फसवणूक, तोटा टाळण्यासाठी आरबीआय कडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पेटीएम पासून बॅंक ऑफ बडोदा वर काही निर्बंध आहेत. आरबीआय ने ‘bob World’ mobile app वर नव्या ग्राहकांना घेण्यावर 10 ऑक्टोबर 2023 पासून घेण्यावर बंदी घातली होती. 31 जानेवारी 2024 पासून पेटीएम वर निर्बंध आहेत. त्यामध्ये बॅंकिंग सर्व्हिस बंद केली आहे. IIFL Finance वर 4 मार्च दिवशी नव्याने गोल्ड लोन देणं किंवा डिस्बर्स करण्यावर बंदी घातली आहे. JM Fin Pdts मध्ये नियामक त्रुटींमुळे आरबीआयने त्यांच्या उत्पादनांना शेअर आणि बाँड फंडिंगपासून प्रतिबंधित केले आहे. दरम्यान कंपनीने नियामकांचे दावे फेटाळले आहेत.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)